Maharashtra Rajya Natya Spardha In Safarchand Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtra Rajya Natya Spardha In Safarchand: मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सफरचंद’ची बाजी; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...

मनोरंजनातून अंजन घालणाऱ्या ‘सफरचंद’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Safarchand Play: मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन रंगभूमीवर दाखल झालेली ‘सफरचंद’ ही नाट्य कलाकृती सध्या चांगलीच गाजतेय. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या सिद्धहस्त दिग्दर्शकानं बसवलेल्या या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सफरचंद’ या नाटकाने प्रथम पारितोषिकासह बाजी मारली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे या पारितोषिकाची घोषणा केली आहे. या नाटकाला रुपये सात लाख पन्नास हजाराचा पुरस्कार मिळणार आहे. आतापर्यंत एकूण २१ पारितोषिक पटकवणाऱ्या सरगम आणि अमरदीप संस्थेच्या 'सफरचंद' या नाटकाने झी नाट्य गौरव, मटा सन्मान, माझा पुरस्कार, सांस्कृतिक कलादर्पण, महाराष्ट्र शासन अशा विविध व्यासपीठावर जोरदार बाजी मारली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील यश आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंददायी असल्याची भावना निर्माता,दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे. (Latest Entertainment News)

‘सरगम’ आणि ‘अमरदीप’ निर्मित, ‘कल्पकला’ प्रकाशित, 'सफरचंद' या नाटकात एक वेगळा विषय मांडला असून ‘सर्वधर्मसमभाव’ हा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या 'सफरचंद' नाटकाने सगळ्याच बाबतीत आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. (Marathi Actors)

फिरता रंगमंच, नेत्रसुखद नेपथ्य, वातावरणाला साजेसं मधुर संगीत, यातून जबरदस्त नाट्यानुभव प्रेक्षकांना मिळतो आहे. खुर्चीला खिळवून टाकणारी परिणामकारकता आणि शंतनु मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदें, अमीर तळवडेकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या दमदार कलावंतांच्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर हे नाटक सध्या चर्चेचा विषय ठरतंय. (Theaters)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT