Devendra Fadanvis In Khupte Tithe Gupte saam tv
मनोरंजन बातम्या

Devendra Fadanvis In Khupte Tithe Gupte: ‘मध्यरात्री शिवसेनेचे आमदार गायब होतात आणि तुम्ही...’ अवधूतच्या धारदार प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर

Devendra Fadanvis News: रविवारच्या भागात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांवर दिलखुलास भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Khupte Tithe Gupte Latest Episode Teaser: ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोची सध्या टेलिव्हिजनसृष्टीत कमालीची चर्चा सुरू आहेय. आतापर्यंत या शोमध्ये राज ठाकरे, उर्मिला मातोंडकर, नारायण राणे, संजय राऊत, नितिन गडकरी या राजकारण्यांनी हजेरी लावली होती.

येत्या रविवारच्या भागात अर्थात १६ जुलैच्या एपिसोडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कारकिर्दीतील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. नुकताच झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर आगामी भागाचा टीझर शेअर करण्यात आला आहे.

या शोच्या आगमी भागात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, अवधूतने देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला. अवधूत म्हणतो, ‘मध्यरात्रीच शिवसेनेचे आमदार गायब होतात आणि तुम्ही सरकार स्थापन करता. रात्री राष्ट्रवादीचे आमदार गायब होतात, तुम्ही पहाटे अजित पवारांबरोबर शपथ घेता, तुम्ही रात्री खूप ॲक्टिव्ह असता, तुम्हाला झोप येत नाही का?’

शेअर केलेल्या टीझरमध्ये अवधूत गुप्तेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. या प्रश्नावर फडणवीस म्हणतात, “हे खरोखर आहे, मी रात्री जास्त ॲक्टिव्ह असतो. मी रात्री सर्वात जास्त एनर्जेटिक असतो, अनेकदा बऱ्याच गोष्टी रात्री करणं जास्त सोपं असतं, म्हणून त्या रात्री होतात.” असं मत फडणवीसांनी व्हिडिओत मांडले.

सोबतच एकदा एका टेलिव्हजन शो अमृता फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी “देवेंद्र फडणवीस पातेलंभर तूप घेऊन ३०- ३५ पुरणपोळ्या आरामात खाऊन टाकायचे.” असं वक्तव्य केलं होतं. अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये म्हणाले, “माझी पत्नी गंमतीत अनेक गोष्टी बोलते आणि नंतर मला ते सहन करावं लागतं. आता मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो, मला पुरणपोळी जास्त आवडत नाही.” सध्या हा टीझर सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT