Ranveer Allahbadia Controversy India's Got Talent  Saam Tv
मनोरंजन बातम्या

'India's Got Talent'चे सर्व एपिसोड होणार डिलीट; रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानानंतर सायबर सेलची मोठी कारवाई

Ranveer Allahbadia Controversy : रणवीर अलाहाबादियाने 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरुन महाराष्ट्र सायबर सेलने या शोचे सर्व एपिसोड यूट्यूबवरुन हटवण्याची मागणी केली आहे.

Yash Shirke

स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची नोंद घेतली. हा मुद्दा संसदेमध्ये देखील गाजला. वादग्रस्त विधान असलेला एपिसोड हटवण्यात आला आहे.

समय रैना, रणवीर अलाहाबादिया यांच्यासह 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये पहिल्या एपिसोडपासून सहभागी झालेले परीक्षक, शोचे निर्माते अशा ३० जणांना समन्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सायबर विभागानेc 'इंडियाज गॉट लेटेंट' शोच्या विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सायबर विभागाने आयटी कायद्याच्या संबंधित कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे आणि या शोचे सर्व (एकूण १८) एपिसोड यूट्यूबवरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिला आयोगाने शेवटच्या एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना प्रत्यक्षपणे आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. १७ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीमध्ये महिला आयोगाच्या कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान एका सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सरने रणवीरची जीभ छाटणाऱ्याला ५ लाख रुपये बक्षीस देणार असल्याचे म्हटले आहे. रणवीरच्या फॉलोवर्समध्येही प्रचंड प्रमाणात घट झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT