Shreya Bugade Post Instagram
मनोरंजन बातम्या

Shreya Bugade Post: मुख्यमंत्र्यांनी श्रेया बुगडेला दिली दिवाळी भेट, अभिनेत्रीने गिफ्टची दाखवली झलक

Shreya Bugade News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक सेलिब्रिटींना दिवाळीची भेट वस्तू दिली आहे.

Chetan Bodke

Maharashtra Cm Send Diwali Gift To Shreya Bugde

अवघ्या काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपली आहे. सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक सेलिब्रिटींना दिवाळीची भेट वस्तू दिली आहे. त्यातीलच एका सेलिब्रिटीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे.

नेहमीच आपल्या खास स्टाईलमध्ये चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या श्रेया बुगडेला मुख्यमंत्र्यांनी दिवाळी गिफ्ट दिले आहे. गिफ्टचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत अभिनेत्रीने माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून अभिनेत्रीला दिपावली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. त्यांनी दिलेली ही भेटवस्तू स्वीकारत त्यांचे तिने आभार मानले आहेत.

Maharashtra Cm Send Diwali Gift To Shreya Bugde

मुख्यमंत्री नेहमीच सणासुदीला मराठी सेलिब्रिटींना खास शुभेच्छा देत, त्यांना आपल्या घरी आमंत्रित करत असतात. गणेशोत्सवावेळीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते. त्यावेळी अनेक बॉलिवूड सिनेतारकांसह मराठी सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. त्यावेळी देखील श्रेयाने सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. (Bollywood)

दरम्यान श्रेया बुगडे ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून सर्वाधिक प्रकाशझोतात आली. तिला या कार्यक्रमाने चाहत्यांमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर श्रेया ‘चला हवा येऊ द्या’मधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमातून तिला महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये प्रसिद्धी मिळाली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT