Marathi Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Attack On Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर हल्ला झाला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर हल्ला

३० लोकांच्या टोळीने अभिनेत्यावर हल्ला केला.

मनोरंजन विश्व हादरले.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला मराठी अभिनेता अंकुर विठ्ठलराव वाढवे आहे. नुकताच अंकुरवर मोठा हल्ला झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने ही बातमी दिली आहे.

https://www.facebook.com/story.php?story_fbid=26863408896649581&id=100002215045208&rdid=hvjQCIHOQ1yOUc3g#

अंकुरने केलेल्या पोस्टनुसार, २९ मे २०२६ रोजी पुसद येथे अभिनेत्यावर हल्ला झाला. २०-३० लोकांच्या टोळीकडून हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण वसंतनगर पोलीस स्टेशनला पोहचले. पोलीसांमुळे मोठा अनर्थ टळला आणि प्रकरण सावरले गेले. मात्र जीवघेण्या हल्ल्यामुळे अभिनेत्याचा संताप झाला आहे. त्याने सोशल मीडियावर कठोर शब्दात पोस्ट शेअर करून, घडलेला प्रकार सांगितला आहे.

अंकुर विठ्ठलराव वाढवेची पोस्ट

"काल पुसदमध्ये माझ्यावर २० ते ३० लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, वसंतनगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने प्रकरण टळले पण यावरून लक्षात येते की, पुसदमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे... यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे..."

Ankur Vitthalrao Wadhave

अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहते कमेंटस करून अभिनेत्याला पाठिंबा देत आहेत. तसेच घडलेल्या प्रकाराबद्दल राग-संताप व्यक्त करत आहे. अभिनेत्याच्या तब्येतीची चौकशी देखील करताना दिसत आहेत.

अंकुर वाढवे करिअर

अंकुर वाढवे हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. अंकुर वाढवेचा सोशल मिडिया खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहते आता अंकुर वाढवेच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT