Monalisa SAAM TV
मनोरंजन बातम्या

Monalisa : महाकुंभमेळ्यामुळे नशीब चमकलं! व्हायरल गर्ल मोनालिसा झळकणार मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं नाव काय?

Mahakumbh 2025 Viral Girl : महाकुंभमेळ्यामुळे प्रसिद्ध झालेली मोनालिसा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तिच्या चित्रपटाचे नाव जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा (Mahakumbh 2025 ) सुरू आहेत. हा महाकुंभमेळा (Mahakumbh 2025) 13 जानेवारीपासून सुरू झाला असून 26 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. महाकुंभमेळ्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. गंगेत स्नान करण्यासाठी सर्व सामान्य भक्तांपासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत अनेकजण महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. महाकुंभमेळ्याला वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येतात. महाकुंभमेळ्यात माळा विकणारी एक मुलगी आता खूप चर्चेत आली आहे.

मोनालिसा नावाची मुलगी महाकुंभमेळ्यात माळा विकत आहे. तिचे रूप कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. महाकुंभमेळ्यामुळे आता मोनालिसाच्या आयुष्याला नवीन वळण मिळाले आहे. तिचे नशीब चमकले आहे. मोनिलिसाला (Monalisa) थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांनी आपल्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांनी त्याच्या आगामी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून मोनालिसाला कास्ट केले आहे. त्यांनी मोनालिसा आणि तिच्या कुटुंबाची भेट घेऊनल चित्रपटाची बोलणी केली आहे. सनोज मिश्रा (Sanoj Mishra) हे मोनालिसा भेटण्यासाठी तिच्या घरी मध्य प्रदेशातील महेश्वर येथे पोहचले. सनोज मिश्रा यांच्या 'द डायरी ऑफ मणिपुर'या चित्रपटात मोनालिसाची वर्णी लागली आहे. मोनालिसा चित्रपटात एका लष्करी जवानाच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. चाहते आता या चित्रपटासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. शूटिंग सुरू होण्याआधी मोनालिसाला अभिनय कसा असतो, नेमकं काय घडते म्हणजे एकंदरच तिला ट्रेनिंग दिले जाणार आहे.

बॉलिवूड सुपरस्टार राजकुमार रावचा भाऊ अमित राव 'द डायरी ऑफ मणिपुर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'द डायरी ऑफ मणिपुर' चित्रपटाचे बजेट जवळपास २० कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे शूटिंग मणिपूर, दिल्ली आणि लंडनमध्ये केले जाणार आहे.सनोज मिश्रा यांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. महाकुंभमेळा मोनालिसाच्या डोळ्यांनी जादू केली. मोनालिसा बंजारा समाजाची आहे. मोनालिसाचे सौंदर्याने अनेक लोक घायाळ झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT