Mahakumbh 2025 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mahakumbh 2025: हेमा मालिनी महाकुंभमेळ्यात सहभागी; त्रिवेणी संगमावर केलं पवित्र अमृतस्नान, VIDEO व्हायरल

Hema Malini Visit Maha Kumbh Mela: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला आहे. त्यांनी पवित्र स्नान करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा चालू आहे. हा महाकुंभमेळा (Mahakumbh 2025) 13 जानेवारीपासून सुरू झाला असून 26 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. गंगेत स्नान करण्यासाठी सर्व सामान्य भक्तांपासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत अनेकजण महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. आता मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर भाजप खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगम या पवित्र ठिकाणी स्नान केले.

पवित्र क्षणी त्यांच्यासोबत जुना अखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज आणि योगगुरू बाबा रामदेवसुद्धा होते. या सर्वांनी त्रिवेणी संगम येथे शाही स्नान घेतले. मकर संक्रांतीनंतर मौनी अमावस्येला दुसरे अमृत स्नान असल्याने महाकुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पवित्र स्नानानंतर हेमा मालिनी म्हणाल्या, "हे माझे भाग्य आहे. मला खूप चांगले वाटले. कोटींच्या संख्येने लोक येथे येत आहेत. मलाही इथे पवित्र स्नानाची संधी मिळाली. यासाठी धन्यवाद." हेमा मालिनी या महाकुंभमेळामध्ये कथाकार देवकीनंदन ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली सनातन धर्म संसदेत पोहोचल्या होत्या. तिथे त्या म्हणाल्या, "सनातन धर्माबद्दल आणि सनातनी लोकांबद्दल वाईट बोलणारे काही अज्ञानी लोक आहेत. काही चुकीच्या गोष्टी सांगतात. सनातन हा जगातील एकमेव धर्म आहे, जो सर्व धर्मांचे स्वागत करतो. सनातन धर्म कोणत्याही धर्माला विरोध करत नाही"

हेमा मालिनी या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. तसेच अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. महाकुंभमेळ्यात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचे मृत्यू तर काही भाविक जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT