Mahadev App Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळा प्रकरण, १००० कोटींची केली होती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक; ईडीकडून माहिती

Mahadev Betting App Case Update: महादेव बेटिंग अॅपसंबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. महादेव बेटिंग अॅप संबंधित १ हजार कोटींचा निधी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात आला आहे. ईडीकडून ही माहिती उघड झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महादेव बेटिंग अॅपसंबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. महादेव बेटिंग अॅप संबंधित १ हजार कोटींचा निधी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात आला आहे. ईडीकडून ही माहिती उघड झाली आहे. महादेव बेटिंग अॅपप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत आरोपी सुरेश चौकानीने ही माहिती दिली आहे.

चौकानीने बनावट कंपन्याच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले आहे. यासाठी त्याने स्टॉक एक्सचेंज अॅपचा वापर केला आहे, अशी माहिती त्याने दिली आहे.ईडीच्या चौकशीत सुरेश चौकानीने हरी संकर टिबरेवाल या व्यक्तीचे नाव समोर आणले आहे. याप्रकरणातील १ हजार कोटी रुपयांची रक्कम बनावट कंपन्या आणि बनावट डीमॅट खात्याद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात आली आहे, असा ईडीला संशय आहे. यासंबंधित ईडी अधिक तपास करत आहे.

महादेव बेटिंग अॅप घोटाळाप्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक करण्यात आली होती. महादेव बेटिंग अॅपप्रकरणात इतर अनेक अभिनेत्यांची चौकशी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील विजेची मागणी २५ हजार मेगावॉटच्या उंबरठ्यावर

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

SCROLL FOR NEXT