Nitish Bharadwaj Police Complaint Against Wife Saam Tv
मनोरंजन बातम्या

'महाभारत'चे कृष्ण Nitish Bharadwaj यांची पोलिस ठाण्यात धाव, IAS पत्नीवर केला मानसिक छळाचा गंभीर आरोप

Nitish Bharadwaj Police Complaint Against Wife: नितीश भारद्वाज यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. नितीश भारद्वाज यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यालाही हजेरी लावली होती.

Priya More

Mahabharata Serial:

प्रसिद्ध मालिका 'महाभारत'मध्ये (Mahabharata Serial) भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज (Actor Nitish Bharadwaj) चर्चेत आले आहेत. नितीश भारद्वाज यांनी आयएएस पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या पत्नीवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून चर्चा होऊ लागली आहे. नितीश भारद्वाज यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. नितीश भारद्वाज यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यालाही हजेरी लावली होती.

नितीश भारद्वाज यांच्या पत्नी स्मिता गटे मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) म्हणून कार्यरत आहेत. नितीश भारद्वाज यांनी पत्नीविरोधात पोलिसात तक्रार करत तिच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे. फ्री प्रेसच्या वृत्तानुसार, अभिनेता नितीश भारद्वाज यांनी भोपाळ पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांच्याशी 14 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्नीविरोधात लेखी तक्रार दिली. नितीश भारद्वाज यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत आणि 2018 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे.'

अभिनेत्याने त्याच्या पत्नीवर आरोप केला की, 'स्मिताने त्यांना त्यांच्या जुळ्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटू दिले नाही.' भारद्वाज यांनी आपल्या तक्रारीत पुढे असे म्हटले आहे की, 'स्मिता आपल्या मुलींना भेटू नये म्हणून त्यांच्या मुलीची शाळा बदलत राहते. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत.' नितीश भारद्वाज यांनी भोपाळ पोलिस आयुक्तांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि आपल्या मुलींची भेट करून देण्याची विनंती केली.

भोपाळ पोलिस आयुक्त यांनी फ्री प्रेसला सांगितले की, 'नितीश भारद्वाज यांच्याकडून तक्रार आली आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी फाल्गुनी दीक्षित यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्या तपास करणार आहेत.' नितीश यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत घटस्फोट हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी असल्याचे सांगितले होते. घटस्फोटाबाबत बोलताना ते म्हणाले होते की, 'होय, आम्ही फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आमच्या विभक्त होण्याचे खरे कारण काय आहे. मला त्या तपशीलात जायचे नाही. आमचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे. मला इतकेच म्हणायचे आहे की घटस्फोट मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक आहे कारण तुम्ही शून्यात जगत असता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Pune Land Scam: पुण्यात पुन्हा जमीन घोटाळा? 750 कोटींच्या जमिनीची 33 कोटीत विक्री

Pune Accident: १२ गाड्यांचा चक्काचूर, ८ जणांचा मृत्यू; पुण्यातील नवले पुलावरील कंटेनरचा अपघात नेमका कसा घडला?

Bihar Election Result: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे पाहाल निकाल?

SCROLL FOR NEXT