Kushal Badrike Madness Machayenge Show Off Air Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike Post : “हिंदी म्हणजे आयुष्यात...”, ‘मॅडनेस मचाएंगे’ बंद होण्यापूर्वी कुशल बद्रिकेने शेअर केली खास पोस्ट

Madness Machayenge Off Air : येत्या दोन दिवसांत सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शो बंद होण्यापूर्वी अभिनेता कुशल बद्रिकेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला भाग पाडणारा विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके होय. कुशलने आपल्या अभिनयाच्या जोरावर फार मोठा चाहतावर्ग कमावला आहे. त्याला विशेष प्रसिद्धी दिली ती ‘चला हवा येऊ द्या’ने. हा कॉमेडी रिॲलिटी शो गेल्या काही दिवसांपूर्वी बंद झाला. त्यानंतर कुशल सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. पण आता तो शोसुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यानिमित्त कुशलने एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये कुशल बद्रिकेने ‘मॅडनेस मचायेंगे’निमित्त मराठी ते हिंदी इंडस्ट्रीमधला प्रवास सांगितला आहे. पोस्ट शेअर करताना त्याने शोच्या सेटवरील काही फोटोज शेअर केलेले आहेत. पोस्टमध्ये कुशलने लिहिलंय की, “ “हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठ्ठी संधी” असं काही मला वाटत नाही ! पण माझा “अमोल पणशीकर” नावाचा मित्र मला कायम म्हणतो, “स्वतःच कॅनव्हास मोठं कर म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही !” म्हटलं एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.”

कुशलने पुढे पोस्टमध्ये लिहिलंय की, “मला खरच मजा आली, खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला. नवीन मित्र मिळाले, नवीन शिकायला मिळालं. आज आणि उद्या ह्या हिंदी कार्यक्रमाचे शेवटचे भाग टेलिकास्ट होत आहेत नक्की बघा “मॅडनेस मजायेंगे” सोनी हिंदीवर. आणि एक गोष्ट अनुभवली, आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगवायची गरज नाही, माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की पुरेसं होतं. (सुकून)”

पोस्टमध्ये कुशलने सेटवरचे धम्माल क्षण एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत कुशलला त्याच्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मॅडनेस मचायेंगे’ हा शो मार्च २०२४ पासून टेलिकास्ट होत होता. प्रेक्षकांकडून दिलासादायक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे निर्मात्यांना हा शो ऑफ एयर करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी आणि रविवारी हा शो टेलिकास्ट होणार असून आज (७ जुलै) हा शो चाहत्यांचा निरोप घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT