Madhuri Dixit Twitter/ @MadhuriDixit
मनोरंजन बातम्या

माधुरीचं OTT वर जोरदार पदार्पण; नेटफ्लिक्स नंतर अ‍ॅमेझॉनचा प्रोजेक्ट केला साईन

नेटमफ्लिक्सची 'फाइंडिंग अनामिका' या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करीत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या एका वर्षात प्रेक्षकांमध्ये ओटीटी (OTT) वरचे चित्रपट, सिरीज पाहण्याची क्रेझ खूप वाढली आहे. झालं असं की एका वर्षात, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'गुलाबो सीताबो' पासून ते अक्षय कुमारच्या (Kumar Kumar) 'लक्ष्मी' पर्यंत निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले. त्याचबरोबर बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार थिएटर व्यतिरिक्त ओटीटीकडे आपले लक्ष वळवत आहेत.

गेल्या एका वर्षात विद्या बालन, सुष्मिता सेन, लारा दत्ता, अभिषेक बच्चन यांसांरख्या अनेक स्टारनी ओटीटीवर पदार्पण केले आणि आता माधुरी दीक्षितचेही नाव या मालिकेत जोडले जाणार आहे.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेटमफ्लिक्सची 'फाइंडिंग अनामिका' या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करीत आहे. या मालिकेत माधुरी एका सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. जी सीरीजमध्ये पत्नी पण आहे आणि आई देखील आहे. करिश्मा कोहली आणि बेजॉय नंबियार यांनी या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे. त्याचवेळी, अशी बातमी येत आहे की नुकताच माधुरीने आणखी एक ओटीटी प्रोजेक्ट साइन केला आहे. पीपिंग मूनच्या वृत्तानुसार, 'फाइंडिंग अनामिका' सोडून माधुरीने अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या प्रोजेक्ट करण्यास होकार दिला आहे. जी एक कौटुंबिक ड्रामा आहे.

'मेरे पास माँ है' असे या ड्रामाचे नाव असेल. 'मेरे पास माँम है' हा शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा 1975 साली रिलीज झालेल्या 'दीवार' या चित्रपटाचा डायलॅाग आहे. याचे दिग्दर्शन आनंद तिवारी करणार आहेत. याआधी आनंदने 2018 मध्ये 'लव्ह पर स्क्वेअर फूट' आणि 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'तिकिट टू बॉलिवूड' आणि गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या ‘बंदिश बैंडिट्स’ या संगीत सीरीजचे दिग्दर्शन केले आहे.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RSS ला १०० वर्षे पूर्ण, PM मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि स्मारक नाणं जारी; काय आहे वैशिष्ट्ये?

Dussehra Marathi Wishes: दसरा आणि विजयादशमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा आणि मेसेजेस

Mumbai To Pawna Lake: वीकेंडसाठी प्लॅन करताय? मुंबईवरून पावना लेकला कसे पोहोचाल? वाचा सविस्तर माहिती आणि पर्याय

Nalasopara : नालासोपाऱ्यात शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग | VIDEO

Crime News : रक्षकच भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर बलात्कार, २ पोलिसांचा काळा कारनामा, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT