BTS Video From Movie Landon Misal Saam TV
मनोरंजन बातम्या

Madhuri Pawar Post: 'लंडन मिसळ'मध्ये माधुरी पवारचा तडका; चित्रपटाचा BTS व्हिडीओ व्हायरल

Landon Misal Song: माधुरी पवारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'लंडन मिसळ' गाणे वाजत आहे.

Pooja Dange

Madhuri Pawar Share Dance Video:

गौरव मोरे काही दिवसांपूर्वी लंडनला गेला होता. गौरव इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रेक्षकांना लंडनची सफर देखील घडवत होता. काही दिवसांपूर्वी गौरवच्या लंडनला जाण्यामागचं कारण समोर आलं. गौरव मोरे 'लंडन मिसळ' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे गेला होता.

या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. या चित्रपटातील BTS व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री माधुरी पवार हिने शेअर केला आहे. या व्हिडीओतून चित्रपटाची कास्ट देखील रिव्हील झाली आहे.

अभिनेत्री माधुरी पवारने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या चित्रपटातील सर्व कलाकार दिसत आहेत. व्हिडीओमध्ये 'लंडन मिसळ' असे गाणे वाजत आहे. तर चित्रपटातील कलाकार यावर डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.

माधुरी पवारने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये गौरव मोरे, माधुरी पवार, ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, वैशाली सामंत आणि आपला लाडका अभिनेता भरत जाधव दिसत आहेत. माधुरी पवार या चित्रपट असल्याने 'लंडन मिसळ' चित्रपटामध्ये भन्नाट डान्स किंवा अप्रतिम लावणी प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही.

गौरव मोरे आणि भरत जाधव एकत्र दिसणार म्हणजे विनोदाची डबल धम्माल पाहायला मिळणार. लंडनमध्ये शूट झालेला हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Andolan: 'फक्त १० रुपयांत मुंबईत मोफत राहा', मराठा आंदोलकांसाठी अनोखी शक्कल; 'तो' मेसेज होतोय व्हायरल

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबईत पावसाचा जोर वाढला, मराठा बांधव प्लॅटफॉर्मवर

Maharashtra Live News Update: पुण्यात ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक, आंदोलनाची दिशा ठरवणार

500 साड्या, 50 किलो दागिने अन् चांदीची भांडी; 'Bigg Boss 19'च्या घरात घेऊन येणारी तान्या मित्तल आहे तरी कोण?

Maratha Aarakshan: मराठा आंदोलकांची रात्र कशी गेली? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT