Malaika Arora's Son Arhaan Khan and Madhuri Dixit's Son Arin Nene Saam Tv
मनोरंजन बातम्या

Star Kids : माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कोणत्या चित्रपटात मिळाली संधी?

माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन नेने आणि मलायका अरोरा मुलगा अरहान खान देखील 'या' चित्रपटासाठी काम करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. करण जोहरने नुकतेच त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'(Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपट निर्मात्यांनी एक बी.टी.एस. (Behind the scenes) व्हिडिओ शेअर केला आहे. स्टारकिड्सना प्लॅटफॉर्म पुरवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या करण जोहरसोबत अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खानने या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आता असे बोलले जात आहे की, माधुरी दीक्षितचा(Madhuri Dixit) मुलगा अरिन नेने आणि मलायका अरोरा(Malaika Arora) मुलगा अरहान खान देखील या चित्रपटासाठी काम करत आहे.

स्टार किड्सची नवी पिढी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान,बिग-बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम यांच्यापाठोपाठ आता माधुरी दीक्षित आणि मलायका अरोरा या दोन्ही अभिनेत्रींची मुलंदेखील आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. वृत्तानुसार, अरहान खान आणि अरिन नेने करण जोहरच्या आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.

करण जोहर पाच वर्षांनंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये 'ए दिल मुश्कील'चे दिग्दर्शन त्याने केले होते. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणवीर आणि आलियाने यापूर्वी 'गली बॉय'मध्ये एकत्र काम केले आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरने इन्स्टाग्राम हॅंडलवर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची एक नोट लिहिली होती.

करण जोहरने त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' पूर्ण केल्याबद्दल त्याच्या टीमचे आभार व्यक्त करत 'आमच्याकडे सेटवर कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागे उत्तम कलाकार होते. माझी टीम ही माझी ताकद आहे. या कथेसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्या सर्वांचे आभार.. मी सदैव ऋणी आहे. 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे', असे करणने त्याच्या नोटमध्ये लिहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT