Madhuri Dixit Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

९० च्या दशकातील एव्हरग्रीन अभिनेत्रीमध्ये माधुरी दीक्षितआणि श्रीदेवी यांचा उल्लेख आहे. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवली.

Manasvi Choudhary

९० च्या दशकातील एव्हरग्रीन अभिनेत्रीमध्ये माधुरी दीक्षितआणि श्रीदेवी यांचा उल्लेख आहे. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवली. या दोघांच्या नृत्यातील अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. असे असतानाही मात्र या दोघींनी कधी एकत्र काम केले नाही. यामुळे सिनेसृष्टीत या दोघीं एकमेकांच्या कट्टर वैरी आहेत. असं समजलं जायचं यासंदर्भात नुकतंच माधुरी दीक्षित श्रीदेवीबद्दलचे तिचे मत मांडले आहे.

नुकतीच एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीबद्दल सांगितले आहे. तिने, "मी आणि श्रीदेवीने कायमच एकमेकींचा आदर केला आहे. पण आम्ही कधीच एकत्र काम केले नाही. एका प्रोजेक्टमध्ये काम केलं, पण आमचे एकमेकीसोबत कोणतेही सीन नव्हते. एक अभिनेत्री म्हणून तिने जे काही नाव कमावलं त्याबद्दल मला तिचा प्रचंड आदर होता. श्रीदेवीने अनेक भाषांमध्ये कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे."

पुढे तिने, "बोनी कपूर यांच्या पुकार या सिनेमाची ती निर्माती होती. पण तेव्हाही आमच्यात जास्त बोलणं होत नव्हते. दोघीही आपआपल्या कामात व्यस्त राहायचो. जास्त एकमेकींना कधी भेटलो नाही. पुकारच्या शुटिंगवेळी माझं लग्न झालं होतं. त्यानंतर तो चित्रपट रिलीज झाला तेव्हा मी अमेरिकेला होते. त्यामुळे आमच्यात कधी बोलणं झालंच नाही. "

"श्रीदेवी माझ्या आधी इंडस्ट्रीत आली होती. ती वयाच्या चौथ्या वर्षापासूनच चित्रपटांत काम करायची. तिने एक प्रसिद्ध अभिनेत्र होण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. त्यामुळे मला कायमच तिच्याबद्दल आदर वाटतो. "

माधुरी दीक्षितचा भूल भुलैया हा चित्रपट १ नोव्हेंबर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. बिग बजेट १५० कोटीमध्ये तयार झालेला हा सिनेमा अद्यापही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. आतापर्यत या चित्रपटाने एकूण 225.15 कोटींचा गल्ला जमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT