Madhuri And Karishma Dil Toh Pagal Hai Film Instagram
मनोरंजन बातम्या

Madhuri And Karishma Dance: २५ वर्षांनंतर माधुरी आणि करिष्मा पुन्हा आल्या एकत्र, ‘दिल तो पागल है’ म्हणत चाहत्यांनी केले डान्सचे कौतुक

Madhuri And Karishma Dil Toh Pagal Hai Film: करिश्मा आणि माधुरीची जोडी एकत्र दिसल्यावर पुन्हा एकदा ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील काही आठवणी चाहत्यांच्या डोळ्यांसमोर ताजे होताना दिसत आहेत.

Chetan Bodke

Madhuri And Karishma Dance Viral Video: ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांचे नाव कायमच अग्रस्थानी आहे. ‘डान्सिंग दिवा’ म्हणून आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही अभिनेत्री आजही वयाची पन्नाशी ओलांडली तरी, जबरदस्त तंदुरुस्त आणि अभिनय क्षेत्रात काही प्रमाणात सक्रिय आहेत. करिश्मा आणि माधुरीची जोडी एकत्र दिसल्यावर पुन्हा एकदा ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील काही आठवणी चाहत्यांच्या डोळ्यांसमोर ताजे होत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा करिश्मा आणि माधुरीने आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे.

करिश्माने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करिश्मा आणि माधुरी या दोघीही डान्स करताना दिसत आहेत. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर दोघीही अभिनेत्री जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. करिश्माने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले की, ‘Dance of E̶n̶v̶y̶ Friendship’ म्हणजेच मैत्रीतील डान्स’

‘दिल तो पागल है’ मधील माधुरी आणि करिश्माचा Envy डान्स तुम्हाला आठवत असेलच. या दोघीही अभिनेत्रींनी इंस्ट्रुमेंटल बीट्सवर केलेल्या डान्सिंग मूव्ह्स पाहून नक्कीच तुमचेही पाय थिरकतील.. शाहरुख खानसोबतच्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील माधुरी दीक्षितचा आणि करिश्मा कपूरचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला होता. निर्माते यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे कौतुक आजतागायत कायम करतात. (Bollywood Actress)

माधुरीच्याही आणि करिष्माच्याही वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, माधुरी दीक्षित नेहमीच अभिनयासह डान्सिंग रिॲलिटी शोमध्ये देखील कायम सक्रिय असते. काही दिवसांपुर्वी माधुरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द फेम गेम’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ती दिसली होती. तर करिष्माबद्दल बोलायचे नाही तर, ब्राऊन या वेबसीरिजमध्ये ती दिसली होती. या वेबसीरिज मधील तिच्या अभिनयाची कायमच चर्चा होत आहे. माधुरीचे वय ५६ आहे तर करिष्माचे वय ४८ आहे. पण दोघींच्याही सौंदर्याची चर्चा नेहमीच होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT