Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. येत्या १२ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेत्री सोनाली बेंद्रे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. नुकतेच सोनी मराठी वाहिनीने माधुरी आणि सोनाली यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये माधुरीने एका दिग्दर्शकासोबत काम करतानाचा मजेशीर अनुभव सांगितला आहे. तिचा हा किस्सा ऐकून सोनालीलाही हसू आवरता आले नाही.
दिग्दर्शकाच्या वागण्यामुळे माधुरीला व्हायचा त्रास
माधुरी दीक्षितने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. मात्र, एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आलेला अनुभव तिने सोनाली बेंद्रेसोबत शेअर केला. सोनालीने माधुरीला एखाद्या दिग्दर्शकासोबत काम केल्याचा पश्चात्ताप झाला आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर माधुरी म्हणाली, “एका चित्रपटात जरा त्रास झाला, कारण दिग्दर्शक जरा हाय व्होल्टेजवाला होता.” यानंतर सोनालीने तो दिग्दर्शक कोण होता, असे विचारले. मात्र, माधुरीने त्याचे नाव सांगण्यास नकार दिला.
माधुरी पुढे म्हणाली, “ या चित्रपटाच्या शूटदरम्यान मी शॉट देत होते आणि तो ट्रॉली शॉट होता. त्यावेळी मी सीनमध्ये असताना म्हणत होते की असं का केलं तू वगैरे तेव्हा मला अचानक रडण्याचा आवाज आला. मी काय झालं म्हणून पाहिलं तर माझे दिग्दर्शक त्या ट्रॉलीवर बसून रडत होते.” हा किस्सा ऐकून सोनाली बेंद्रेला हसू आवरता आले नाही. त्यानंतर माधुरी आणि सोनाली दोघीही पोट धरून हसताना
‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरीचा नवा अंदाज
माधुरी दीक्षित पहिल्यांदाच ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. त्यामुळे तिचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. सोनाली बेंद्रेसोबतच्या तिच्या गप्पा आगामी भागात पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, सोनाली बेंद्रे निर्मित ‘सोहळा’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम १२ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.