Madhuri Dixit Film Panchak Box Office Collection Instagram/ @madhuridixitnene
मनोरंजन बातम्या

Panchak Movie Collection: माधुरी दीक्षितच्या 'पंचक'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पहिल्या विकेंडला इतक्या कोटींची कमाई

Panchak Movie Box Office Collection: डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' चित्रपट ५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटाने पहिल्या विकेंडला किती कोटींची कमाई केली आहे, जाणून घेऊया...

Chetan Bodke

Madhuri Dixit Film Panchak Box Office Collection

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' चित्रपट ५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच तिकिटबारीवर हाऊसफुल्लचा बोर्ड पाहायला मिळत आहे. अफलातून कथा असलेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपटाने पहिल्या विकेंडला किती कोटींची कमाई केली आहे, चला तर जाणून घेऊया... (Marathi Film)

जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित 'पंचक' चित्रपटाने पहिल्या विकेंडला केलेल्या कमाईचा आकडा 'मुव्ही वॅल्यू' या ट्रेड ॲनालिस्टने दिला आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने २५ लाख, दुसऱ्या दिवशी २८ लाख, तिसऱ्या दिवशी ३० लाख, तर चौथ्या दिवशी २० लाखांची कमाई केली आहे.

पहिल्याच विकेंडला या चित्रपटाने १.३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. (Marathi Actors)

चित्रपटाची कथा

घरात पंचक लागल्यामुळे आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातल्या सर्वच सदस्यांना भेडसावत असते. त्यामुळे प्रत्येक जण यावर उपाय कशाप्रकारे शोधतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार ? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. सलग चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लचा बोर्ड पाहायला मिळाला. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT