शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी पाठवली नोटीस! Saam Tv
मनोरंजन बातम्या

शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी पाठवली नोटीस!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कठीण काळातून जात आहे. पती राजकुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अडकल्यानंतर आता फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पाचा लखनऊ पोलीस तपास करत आहेत.

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी Shilpa Shetty सध्या कठीण काळातून जात आहे. पती राज कुंद्राच्या Raj Kundra पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अडकल्यानंतर आता फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पाचा लखनऊ पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयओसिस वेलनेस सेंटर IOSIS Wellness Center प्रकरणात लखनऊ पोलिसांनी शिल्पा शेट्टीला नोटीस पाठवली आहे.

वास्तविक, वेलनेस सेंटरच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईची चौकशी करण्यासाठी लखनऊ पोलीस मुंबईला पोहोचले. पण शिल्पा शेट्टी तिथे सापडली नाही. शिल्पा शेट्टी तेथे नसल्याने लखनऊ पोलिसांनी तिच्या व्यवस्थापकाला नोटीस दिली आहे.

हे देखील पहा-

3 दिवसात द्यावे लागेल उत्तर;
शिल्पा शेट्टीला या नोटिसला 3 दिवसात उत्तर द्यावे लागणार आहे. शिल्पा शेट्टीसह, आयओसिस वेलनेस सेंटरच्या किरण बावा यांना देखील लखनऊ पोलिसांनी Police नोटीस बजावली आहे. तसेच तिला या संपूर्ण प्रकरणावर उत्तर देण्यास सांगितले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वृत्तानुसार, 1 वर्षापूर्वी, आयओसिस वेलनेस सेंटरच्या नावाने फसवणूक केल्याबद्दल हजरतगंज आणि विभूतिखंड पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या या प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, किरण बावा, विनय भसीन, अनिका चतुर्वेदी, नवनीत कौर, आशा आणि आयोसिस कंपनीच्या पूनम झा यांच्यावर अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप होता. या संपूर्ण प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईचे नावही समोर आले आहे. एफआयआरमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव कंपनीच्या अध्यक्षपदी आणि तिची आई सुनंदा शेट्टीला Sunanda Shetty कंपनीच्या संचालकपदी देण्यात आले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरूवारपासून सेवेत, बंगळूरूहून येणार पहिलं विमान, वाचा सविस्तर

Zodiac signs fortune: 24 डिसेंबरचा दिवस ठरणार करिअर टर्निंग पॉइंट? ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

Tirgrahi Yog: 200 वर्षांनी मकर संक्रातीला बनणार त्रिग्रही राजयोग; या राशींच्या व्यक्तींना मिळणार धनदौलत आणि राजेशाही सुख

Thackeray Brothers : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण! आज दुपारी 12 वाजता घोषणा, ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे होणार?

New Rules 2026: १ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT