Amitabh Bachchan and Jaya Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

असा झाला रेखा-अमिताभ यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END', जया बच्चन यांचं कनेक्शन माहितेय का ?

अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरचे किस्से चर्चेत येऊ लागले. जयाही इंडस्ट्रीशी संबंधित असल्याने ही गोष्ट त्यांच्यापासून लपून राहिली नाही. म्हणूनच जयाने अफेरची कहाणी कायमची संपवण्याचा निर्णय घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या वैवाहिक आयुष्याला ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 'जंजीर' चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न झाले. अमिताभ आणि जया यांच्या नातेसंबंधात, विश्वास, आदर यासह समंजसपणा मोठी भूमिका बजावते. अमिताभ आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीची बरीच चर्चा होत असली तरी अमिताभ आणि जया यांची लव्हस्टोरीही काही कमी रंजक नाही. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरची माहिती मिळाल्यावर जया बच्चनयांनी खूप समजूतदारपणा दाखवला होता. जाणून घेऊ अमिताभ आणि जया यांची लव्हस्टोरी....

जेव्हा जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले. तेव्हापासूनच जया यांना अमिताभ बच्चन आवडू लागले होते. मात्र, तोपर्यंत जया बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला होता आणि अमिताभ अजूनही स्ट्रगलर अभिनेते होते. जया बच्चन यांना अमिताभ बच्चन आवडले तर होते, पण त्यांच्यासोबतच लग्न होईल असे जया बच्चन यांना कधीच वाटलं नव्हतं.

जया बच्चन यांना सुरुवातीपासूनच अमिताभ आवडायचे...

जया बच्चन यांनीच याचा खुलासा १९९८ मध्ये अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये केला होता. त्याशो मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन पाहुणे म्हणून आले होते. संवादादरम्यान जेव्हा सिमी ग्रेवालने जया बच्चन यांना विचारले की, तुम्ही अमिताभ बच्चनसोबत लग्न करणार हे तुम्हाला कसे कळले? यावर जया बच्चन म्हणाल्या, 'मला माहित नव्हते की मी या व्यक्तीशी लग्न करणार आहे. अमिताभ हे एकमेव व्यक्ती आहेत, जे मला हुकूम देऊ शकतात आणि मी आनंदाने त्याचे पालन करते'. असेही जया बच्चन यांनी शो दरम्यान सांगितले.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चनयांना 'जंजीर' चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी लंडनला जायचे होते. पण अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना जेव्हा ही गोष्ट समजली. त्यावेळी तेव्हा ते म्हणाले की, 'जर तुम्हाला परदेशात एकत्र जायचे असेल तर आधी लग्न करा'.अमिताभ आपल्या वडिलांच्या आदेशाची अवहेलना करू शकले नाहीत, अशा प्रकारे जया-अमिताभयांचा विवाह ३ जून १९७३ रोजी झाला. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते. पण याच दरम्यान अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरचे किस्से चर्चेत येऊ लागले. जयाही इंडस्ट्रीशी संबंधित असल्याने ही गोष्ट त्यांच्यापासून लपून राहिली नाही. म्हणूनच जयाने अफेरची कहाणी कायमची संपवण्याचा निर्णय घेतला.

...म्हणून रेखाने स्वतःला अमिताभपासून दूर केले

माहितीनुसार, जया बच्चन यांनी रेखाला रात्रीच्या भोजनासाठी आमंत्रित केले होते. जेवण करून झाल्यानंतर जया बच्चन रेखाला बाहेर सोडायला आल्या तेव्हा जया बच्चन जे बोलल्या ते ऐकून रेखाला खूप आश्चर्य वाटले. 'आता काहीही झाले तरी मी अमितला सोडणार नाही', असे त्यावेळी जया बच्चन रेखाला म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT