Famous Influencer saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Influencer : 'मी १३ वर्षांची होते, तेव्हा चुलत भावाने माझ्यावर...'; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरने रडत रडत सांगितला 'तो' प्रसंग | VIDEO

Social Media Influencer Molested By Cousin : प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. चुलत भावानेच तिचा छळ केला होता. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरने बालपणीचे सीक्रेट सांगितले

वयाच्या १३ व्या वर्षी इन्फ्लुएन्सरचा लैंगिक छळ झाला

इन्फ्लुएन्सरच्या चुलत भावानेच तिच्यासोबत गैरवर्तन केले

'लॉक अप २' या शोमध्ये सध्या स्पर्धक आपल्या आयुष्यातील काही रहस्य सांगताना दिसत आहे. त्यामुळे 'लॉक अप २' एकामागोमाग धक्कादायक खुलासे केले जात आहे. अशात आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रेया कालराने तिच्या आयुष्याबद्दल एक वेदनादायक सत्य उघड केले, ज्यामुळे अनेक स्पर्धकांच्या डोळ्यात अश्रू आले.

श्रेया कालराने खुलासा केला की, वयाच्या १३ व्या वर्षी तिच्या एका चुलत भावाने तिचे लैंगिक शोषण केले होते. श्रेया म्हणाली की तिला हे रहस्य गुप्त ठेवायचे होते कारण त्याचा तिच्या कुटुंबावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. ती म्हणाली, "मी माझे रहस्य लपवत नव्हते. मला खात्री आहे की मी माझ्या मेहनतीने तिथे पोहोचू शकेन. पण मला ते बाहेर येऊ द्यायचे नव्हते कारण, त्यामुळे माझ्या कुटुंबात खूप काही बदलू शकते."

श्रेयाने स्पष्ट केले की लहानपणी ती अनेकदा तिच्या आजीच्या घरी जायची, जिथे ही घटना घडली होती. ती म्हणाली, "मी १३ वर्षांची होते. त्यावेळी माझ्यासोबत काय घडत होतं हे मला कळत नव्हतं. आजपर्यंत माझ्या कुटुंबातील कोणालाही याबद्दल माहीत नाही. फक्त ऋषभ जायसवाल (श्रेयाचा प्रियकर) याबद्दल माहीत आहे. मला स्वतःला पीडित म्हणून बघायचं नाही. शोच्या बाहेर लोकांनी माझ्याबद्दल वाईट वाटून घ्यावं असं मला वाटत नाही."

श्रेया पुढे म्हणाली, "त्याच्या आईचे निधन झाले होते आणि माझ्या आईने सुमारे तीन वर्षे त्याची काळजी घेतली होती. जर माझ्या आईला सत्य कळले, तर ती पूर्णपणे खचून जाईल. मी या इंडस्ट्रीत असल्यामुळे आणि काही वाद निर्माण झाल्यामुळे माझ्या भावाचा आधीचा साखरपुडा मोडला होता. आता त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर येत आहे. मला भीती वाटत होती की, या सत्यामुळे त्यांच्या आनंदावर पुन्हा परिणाम होईल."

शेवटी श्रेया खूप भावुक झाली म्हणाली, "मला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं होतं की, मी लोकांना नेहमी त्यांच्या हक्कांसाठी लढायला सांगते, पण मी स्वतः इतकी वर्षे माझ्या हक्कांविषयी कोणालाही सांगू शकले नाही. एवढं सगळं होऊनही, मी माझ्या कुटुंबासोबत त्याच नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT