Kangana Ranaut Lock Upp Season 2 Updates
Kangana Ranaut Lock Upp Season 2 Updates saam tv
मनोरंजन बातम्या

Lock Upp 2: कंगनाच्या लॉक अपमध्ये येणार नवा ट्वीस्ट, खुद्द होस्टनेच सांगितल्या रंजक गोष्टी

Chetan Bodke

Lock Upp Season 2 Updates: बॉलिवूडची ड्रामा क्वीन कंगना रणौत फक्त चित्रपटांतूनच नाही तर टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणारी कंगना एका रिॲलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गेल्या वर्षी एकता कपूरने 'लॉक अप' हा रिॲलिटी शो प्रेक्षकांसमोर आणला.

'लॉक अप' च्या पहिल्या सीझनला चांगलीच पसंदी मिळाली असून प्रेक्षक आता या शोच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहे. 'लॉक अप सीझन 2' ची चर्चा सध्या बरीच सुरु आहे.

पहिल्या सीझनला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनचीही घोषणा केली आहे. अनेक सेलिब्रिटींची यामध्ये येणार अशी चर्चा सुरु होती, पण नेमके कोणते कलाकार यात दिसणार. याचं उत्तर आपल्याला शोच्या पहिल्याच दिवशी मिळेल. कंगना रणौतने होस्ट केलेला रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन 2' 31 मार्चपासून सुरू होऊ शकतो. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

'लॉक अप'चा पहिला सीझन ओटीटीवर प्रसारित झाला होता. पहिला सीझन MX Player आणि Alt Balaji या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. आता दुसरा सीझन ओटीटी वर प्रदर्शित होतो की, टीव्हीवर हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार, दुसरा सीझन टीव्हीवरच प्रदर्शित होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

पहिल्या सीझनमध्ये 'बिग बॉस 15' फेम अभिनेता करण कुंद्रा जेलरच्या भूमिकेत दिसला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये दोन जेलर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करण कुंद्रासोबत या सीझनमध्ये रुबिना दिलैक दुसरी जेलर असण्याची शक्यता आहे.

'लॉक अप'च्या दुसऱ्या सीझनमध्ये अनेक टीव्ही स्टार्सची नावे स्पर्धकांच्या यादीत दिसत आहेत. या शोमध्ये सौंदर्या शर्मा, उमर रियाझ, दिव्या अग्रवाल आणि प्रसिद्ध रॅपर एमिवे बांटाय यांसारखे स्टार्स दिसणार असल्याचे बोलले जात आहे. आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 'लॉक अप'चा पहिला सीझन स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने जिंकला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT