Oscars 2023: दीपिकाचे गॉर्जियस फोटो नेटकऱ्यांना पाडतायेत भुरळ, खास लूकची होतेय सर्वत्र चर्चा
Deepika Padukone Look In Oscars 2023: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एक वेगळी भूमिका साकारली. दीपिका आज सादरकर्ती (प्रेसेंटर)म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होती. अभिनेत्रीने तिच्या सिम्पलीसिटीने चाहत्यांची मने जिंकली. यावर्षी भारताला 2 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.
ऑस्कर 2023 भारतासाठी खूप खास होता. कारण यावेळी भारताने एक नाही तर दोन ऑस्कर जिंकले आहेत. या खास सोहळ्याला दीपिका पदुकोण प्रेझेंटर म्हणूनही उपस्थित होती, तिच्या काळ्या आऊटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दीपिकाने ऑस्कर 2023मध्ये काळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर गाऊन घातला होता. दीपिका पदुकोणचे पुरस्कार सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिचा लूक पाहून तुम्हीही हरखून जाल. दीपिकाने पुन्हा एकदा आपल्या साधेपणाने (सिम्पलीसिटी) चाहत्यांना वेड लावले.
या स्पेशल अवॉर्ड फंक्शनसाठी दीपिकाने लोकप्रिय ब्रँड लुई व्हिटॉनचा ब्लॅक लॉन्ग ऑफ शोल्डर ड्रेसची निवड केली होती. दीपिका या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडरही देखील आहे. यासह, तिने हातात मखमली ग्लोव्हजसह घालून लूक पूर्ण केला आहे. यासोबतच दीपिकाने कार्टियर डायमंड नेकलेस देखील घातला आहे. तिच्या ड्रेसवर डायमंड नेकलेस खूपच सुंदर दिसत आहे.
दीपिका पदुकोणने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या खास आउटफिटचे फोटोही शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती गॉर्जस दिसत आहे. चाहते तिचे कौतुक करत आहेत. दीपिका पदुकोणने ऑस्कर 2023 मध्ये सादरकर्ती म्हणून अनुभव घेतला.
दीपिका केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप लोकप्रिय आहे. ती आंतरराष्ट्रीय ख्यातीची सेलिब्रिटी आहे. सोशल मीडियावरही तिचा जबदस्त फॅन फॉलोअर आहे. 72 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. जेव्हा RRR आणि The Elephant Whispers या भारतीय कलाकृतींना ऑस्कर पुरस्कार या खास प्रसंगी दीपिका या कार्यक्रमाचा भाग झाली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.