Lock Upp Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lock Upp: ५२ वर्षाच्या अभिनेत्याने सारखं सारखं kiss केलं; अभिनेत्री म्हणाली माझ्या बापानेसुद्धा इतके किस घेतले नसतील

Lock Upp: 'लॉक अप' शोमध्ये राम कपूरच्या किसिंगवरून श्रेया कालरा संतापली. शिल्पा शिंदेंसमोर तिने नाराजी व्यक्त करत मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावरही राम कपूर ट्रोल होत आहेत.

Shruti Vilas Kadam

Lock Upp: नेटफ्लिक्सवरील 'लॉक अप' (Lock Upp) या रिअॅलिटी शोमध्ये दिवसेंदिवस नवे वाद समोर येत आहेत. यावेळी अभिनेता राम कपूर आणि स्पर्धक श्रेया कालरा यांच्यातील वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात दोघांनी एकाच टीममध्ये खेळत महत्त्वाचे टास्क पूर्ण केले होते. त्या वेळी श्रेयाने 'कंट्रोलर'ची भूमिका पार पाडत राम कपूरला स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी सलग तीन टास्क जिंकले. या आनंदात राम कपूरने श्रेयाच्या गालावर आणि कपाळावर अनेकदा किस केले होते. त्यावेळी श्रेयाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आता तिने या प्रकारावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

अलीकडील भागात श्रेयाने अभिनेत्री शिल्पा शिंदेशी संवाद साधताना श्रेयाने राम कपूरच्या वागणुकीवर टीका केली. श्रेया म्हणाली, "मी तुझ्यासाठी तीन टास्क जिंकले, तरीही तू मला पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाहीस. तू भित्रा आहेस. अशा 'सीनिअर'चा मी आदर करायचा? अशा सीनिअरवर मी थुंकते. जर फराह-जींनी मला विचारलं की मी असं का म्हणाले, तर मी त्याचं कारण सांगेन. जर त्याने पुन्हा मला किस करण्याचा प्रयत्न केला, तर मी त्याचा चेहरा पकडेन आणि त्याला म्हणेन, 'भावा, माझे स्वतःचे वडीलही मला इतकं किस करत नाहीत, त्यामुळे तू तरी असं करू नकोस.'"

श्रेयाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही राम कपूरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी दोन मुलांचा पिता असलेल्या राम कपूरने सार्वजनिक ठिकाणी अधिक संयमाने वागायला हवे होते, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याचा हेतू चुकीचा नसल्याचे म्हटले असले, तरी कोणाच्याही वैयक्तिक मर्यादांचा आदर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

विशेष म्हणजे, 'लॉक अप'च्या प्रीमियर सोहळ्यातही राम कपूरने निर्माती एकता कपूर यांना स्टेजवर किस केले होते. त्यावेळीही त्यांच्या या कृतीवर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. आता श्रेया कालराने थेट नाराजी व्यक्त केल्यानंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर राम कपूर काय स्पष्टीकरण देणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT