Chunky Pandey Viral video
Chunky Pandey Viral video Instagram
मनोरंजन बातम्या

Chunky Panday Dance: चंकी पांडेच्या तालावर सांगलीकरांनी धरला ठेका; महाविद्यालयीन तरुण- तरुणींना दिला सक्सेस कानमंत्र...

Chetan Bodke

Chunky Pandey Dance Video: बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांपासून ते दुर आहेत. सध्या त्यांचा एक डान्स सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्यांनी नुकताच सांगलीकरांना आपल्या डान्सचा जलवा दाखवला हा सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेचा विषय ठरला आहे. “ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता...” या गाण्यावर चंकी पांडेंनी सांगलीमध्ये धुमाकूळ घातला.

निमित्त होतं संजय भोकरे कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटच्या पारितोषिक वितरण समारंभाचं. या कार्यक्रमाला चंकी पांडेने हजेरी लावत आपला जलवा दाखवला. यावेळी चंकी पांडे यांनी आपल्या विशिष्ट डायलॉगने प्रेक्षकांना लोटपोट हसायला लावले, सोबतच काही त्यांच्या चित्रपटांतील प्रसिद्ध गाण्यांवरही कॉलेजमधील युवक- युवतींना ठेका धरायला लावला. सोबतच चंकी पांडेने यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत अनेक विषय मनमोकळेपणाने संवाद साधला.

बॉलिवूड सिनेसृष्टीत अभिनेता चंकी पांडेची एक विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आपल्या खास शैलीत चित्रपट सुपर- डुपर हिट केले आहेत. सोबतच अलिकडच्या काळात काही अल्बममधून सुद्धा चंकी पांडेने अभिनय करत आपली गाणी आणि डायलॉगच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे.

सांगलीतील भोकरे कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात चंकी पांडेने गाणी आणि डायलॉगच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्वांनाच आपल्या तालावर ठेका धरायला लावला. यावेळी चंकी पांडेंनी उपस्थितांचे आभार मानत, माझी लेक अनन्या हिला सुद्धा माझ्याप्रमाणेच भरभरुन प्रेम द्या. माझ्या प्रमाणेच तिला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जुमला पर्व संपतंय, येत्या ४ जूनपासून अच्छे दिन येतील; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भाजपवर टीका

Health Tips: या लोकांनी फणस खाऊ नये

Today's Marathi News Live: अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

SCROLL FOR NEXT