मुंबई : अजय देवगण (Ajay Devgan) आणि श्रिया सरन (Shriya Saran) यांचा दृश्यम हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. विजय साळगांवकर आणि त्याच्या कुटुंबावर आधारित या चित्रपटाची कथा होती. मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटात एका लहान मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु चित्रपटाच्या शेवटी तीच लहान मुलगी सर्व सांभाळून घेते आणि कुटुंबावरील संकट टाळते. दृश्यम चित्रपटातील ही लहानगी नेमकी आहे तरी कोण?
दृश्यम चित्रपटातील अनू साळगांवकर हिचे खरे नाव मृणाल जाधव आहे. बाल कलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मृणाल जाधव मॉडेलिंग सुद्धा करते. रितेश देशमुखच्या 'लई भारी' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मृणालने टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. २०१२ साली आलेली 'राधा ही बावरी' या मालिकेमध्ये सुद्धा तिने महत्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा ती फक्त चार वर्षाची होती. मृणालचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. मृणाल जाधव पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांची मुलगी आहे. मृणालची आई गृहिणी आहे. तिला मोठा भाऊ असून त्याचे नाव नाव पराग जाधव आहे.
मृणाल जाधवने 'तू ही रे' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षांच्या मनावर छाप सोडली होती. तसेच तिची 'दृश्यम'मधील भूमिकाही लक्षवेधी ठरली. मृणाल आता दृश्यम २ मध्ये सुद्धा दिसणार आहे.
मृणालने नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. सात वर्षानंतर मृणालमध्ये झालेला बदल तुम्हाला नक्की जाणवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.