Asha Bhosle Passes Away Saam tv
मनोरंजन बातम्या

Asha Bhosle: 'मला गाताना मृत्यू यावा एवढंच देवाकडे मागणं...'; सुरसम्राज्ञी आशा भोसलेंचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Asha Bhosle: आशा भोसले यांचा 'गाता गाता मृत्यू यावा' हा आपली इच्छा व्यक्त करणारा इमोशनल व्हिडिओ त्यांच्या निधनानंतर पुन्हा व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Shruti Vilas Kadam

भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक भावनिक व्हिडिओ सध्या विशेष चर्चेत आला असून, त्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली एक इच्छा त्यांच्या चाहत्यांच्या मनाला भिडली आहे.

या व्हिडिओमध्ये आशा भोसले म्हणताना दिसतात की, “माझी देवाकडे एकच इच्छा आहे… मला गाता गाता मृत्यू यावा.” त्यांच्या या साध्या पण हृदयस्पर्शी इच्छेने चाहत्यांना भावुक केले आहे. हा व्हिडिओ एका कार्यक्रमादरम्यानचा असून, त्यावेळी उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनाही त्यांच्या या विधानाने हेलावून टाकले होते.

आशा भोसले यांनी आपल्या आयुष्यभर संगीताला सर्वोच्च स्थान दिलं. त्यांनी अनेक वेळा सांगितलं होतं की, “माईक हाच माझा परमेश्वर आहे.” लहान वयापासून संगीत क्षेत्रात सक्रिय असलेल्या आशाताईंनी आयुष्यभर संघर्ष करत आपल्या आवाजाने जगभरात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या मते, माईक हातातून सुटण्यापेक्षा त्यांचं आयुष्य संपावं हीच त्यांची इच्छा होती.

त्यांच्या निधनानंतर हा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे. आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. त्यांनी आठ दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्य करत हजारो गाणी गायली आणि भारतीय संगीतसृष्टीला अमूल्य योगदान दिलं. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी आणि संगीतावरील निस्सीम प्रेम कायम चाहत्यांच्या मनात जिवंत राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT