मराठी चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका अशा सर्व क्षेत्रात काम केलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज सोमवार दि. २४ जुलै रोजी निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्य वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेले अनेक दिवस ते आजारी होते.
चार दशकाहून अधिक कला त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांनी काम आहे.
जयंत सावरकर यांनी १०० हुन अधिक नाटकं आणि ३० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जयंत यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते.
जयंत सावरकर त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. (Latest Entertainment Mews)
जयंत सावरकर यांनी वायाच २०व्या वर्षांपासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'एकच प्याला'मधील तळीराम, 'तुझे आहे तुजपाशी'तील आचार्य, 'व्यक्ती आणि वल्ली'मधील अंतू बर्वा आणि हरितात्या या त्यांच्या गाजलेल्या भूमिका. जयंत सावरकर यांनी जुन्या आणि नव्या पिढीतील कलाकरांसोबत काम केले आहे.
केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे ते चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम यांच्यासोबत जयंत सावरकर यांनी काम केले आहे. (Celebrity)
जयंत सावरकर आई कुठे काय करते या मालिकेचा भाग होते. या मालिकेत त्यांनी अरुंधतीची सासू कांचनच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.