Gangaram Gavankar Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gangaram Gavankar Passes Away: 'वस्त्रहरण'चे नाटककार काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Playwright Death: मालवणी नाटकांना मुख्य प्रवाहात आणणारे ज्येष्ठ लेखक आणि नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन. साहित्यविश्वात हळहळ.

Shruti Vilas Kadam

Gangaram Gavankar Passes Away: मालवणी बोलीभाषेला नाट्यसृष्टीत प्रमुख स्थान देणाऱ्या आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अमर झालेले गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी रात्री उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दहिसर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर दीर्घ आजारावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. गवाणकर यांचं पार्थिव मंगळवारी सकाळी ९.३० वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दहिसर येथील अंबावाडी-दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

गवाणकर यांनी मालवणी बोलीभाषेतील नाटके मुख्य व्यावसायिक रंगभूमीवर आणली. ‘वस्त्रहरण’ हे त्यांचं त्यापैकी एक नाटक त्या नाटकाचे आजही हजारो प्रयोग सुरु आहेत.
त्यांनी ‘वात्रट मेले’ यांसारखी नाटकेही लिहिली ज्याचे दोन हजारांहून अधिक प्रयोग झाली आहेत. तसेच त्यांनी वन रूम किचन, दोघी, वर भेटू नका यासारखी २० हुन अधिक नाटके लिहली. नाट्यक्रमाबरोबरच त्यांनी कादंबरी, अनुवाद यांमध्येही सक्रिय लेखन केले. ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकात त्यांनी आजपर्यंतच्या प्रवासाची मांडणी केली आहे.

अनेक नाटकातून गवाणकर यांनी विनोदी शैलीमध्ये सामाजिक सत्य मांडले आणि बोलीभाषेचा अभिमान जागवला. त्यांची ही कलाकारी अनेकांना प्रेरणादायी ठरली आहे. अनेक कलावंत व लेखिकांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत ‘मालवणी नाट्यसृष्टीचा एक दीप स्तंभ हरपला’ अशी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्र्याकडून ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली

'अभिजात मराठीचे सौंदर्य आणि सौष्ठव मालवणी बोली आणखी ठसठशीतपणे मांडते. अशा या मालवणीची नादमाधुर्यता आणि तिचा ठसका स्वर्गीय गवाणकर यांनी आपल्या नाट्यकृतींतून जगभर पोहोचविला. त्यांच्या इतर नाट्यकृती देखील वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन राहिल्या आहेत. पौराणिक ढाच्यातील 'वस्त्रहरण' वर्तमानातील चपखल संदर्भ घेत आजही महाविक्रमी वाटचाल करीत आहे, ही त्यांच्या लेखनाची ताकद राहीली. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी, कला-साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. गवाणकर कुटुंबीय, मराठी रंगभूमी चळवळ, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT