Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : सिनेसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड

Famous Action Star Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांच्या निधानाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली . अभिनेता आपल्या ॲक्शन स्टाइलसाठी ओळखला जायचा.

Shreya Maskar

आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणाऱ्या अभिनेत्याचे निधन झाले आहे.

अभिनेते दिग्गज मार्शल आर्टिस्ट आणि ॲक्शन स्टार होते.

अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. 'वॉकर, टेक्सास रेंजर' (Walker, Texas Ranger) या शोमुळे जगभर ओळखले जाणारे, दिग्गज मार्शल आर्टिस्ट आणि ॲक्शन स्टार चक नॉरिस (Chuck Norris) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

चक नॉरिस यांचे शुक्रवारी सकाळी हवाई (Hawaii) येथे रुग्णालयात दाखल असताना निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे चाहते आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले की, "चक नॉरिस यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि केलेल्या प्रार्थनांबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभार मानले." कुटुंबियांनी या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या privacy चा आदर करण्याची विनंतीही केली आहे.

चक नॉरिस यांचे करिअर

चक नॉरिस यांचा जन्म 1940 मध्ये ओक्लाहोमा येथे झाला होता. मार्शल आर्ट्सचे दिग्गज विजेते आणि कराटे, तायक्वांदो, ज्युडो व ब्राझिलियन जिउ-जित्सू यांसारख्या विविध प्रकारांमध्ये 'ब्लॅक बेल्ट'चे मानकरी बनण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेच्या हवाई दलात (US Air Force) सेवा बजावली होती. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 'द रेकिंग क्रू' (1968) या चित्रपटातील पहिल्या भूमिकेने झाली. परंतु 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात ब्रूस ली यांच्यासोबत केलेल्या पडद्यावरील लढतीमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली.

गेल्या काही वर्षांत त्यांनी 'डेल्टा फोर्स' आणि 'मिसिंग इन ॲक्शन' सारख्या अनेक गाजलेल्या ॲक्शन चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि त्याद्वारे ॲक्शन नायकाचे (action heroism) प्रतीक म्हणून आपली ओळख निर्माण केली.'वॉकर, टेक्सास रेंजर' या टीव्ही मालिकेत 'कॉर्डेल "कॉर्ड" वॉकर' ही भूमिका साकारणारे अभिनेते म्हणून चक नॉरिस प्रचंड लोकप्रिय झाले.या दिग्गज ॲक्शन स्टारच्या पश्चात त्यांची पत्नी 'जीना ओ'केली आणि पाच मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT