K. Viswanath Condole Saam Tv
मनोरंजन बातम्या

K. Viswanath: के.विश्वनाथ यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा, बॉलिवूडसह दाक्षिणात्य कलाकारांनीही वाहिली श्रद्धांजली...

विश्वनाथ यांच्या निधनाची बातमी येताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Chetan Bodke

K. Viswanath: तेलगू- हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक कासीनाधुनी विश्वनाथ (K. Viswanath) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. हैदराबाद (Hyderabad) मधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी श्रद्धांजली वाहिली आहे.

विश्वनाथ यांच्या निधनाची बातमी येताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. अनिल कपूर ट्वीट करत म्हणतात, "के. विश्वनाथजी मला तुम्ही अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. ईश्वर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सेटवर तुमच्यासोबत मला मंदिरात असल्यासारखे वाटत होते." तर संगीतकार ए. आर. रेहमानने देखील के. विश्वनाथ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सोबतच कमल हसन देखील ट्वीट करत म्हणतात, "के विश्वनाथ यांना जीवनातील अंतरंग आणि कलेचे अमरत्व पूर्णपणे समजले आहे. त्यामुळे त्यांची कला त्यांच्या जीवनकाळातही आणि आता ते नसतानाही जोपासली जाईल. त्यांची कला चिरंजीव होवो."

सोबतच तेलुगु अभिनेता चिरंजीवी कोनिडेला म्हणतो, "निधनाची बातमी कळताच सुन्न झालो. के. विश्वनाथ यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत फार मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरुन निघणारी नाही. चित्रपट जगतातील प्रतिष्ठीत माणूस. त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्या सोबत जिवंत राहतील! ओम शांती !!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

SCROLL FOR NEXT