Dharmendra Shares His Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Dharmendra Viral Video: वयाच्या ८७व्या वर्षी पाहायला मिळाला धर्मेंद्रचा सुरेल अंदाज

Dharmendra Shares His Video: धर्मेंद्र यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Actor Dharmendra Shares His Video Of Singing: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आता सिनेसृष्टीपासून दूर आहेत. मात्र ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नवीन फोटो असोत किंवा व्हिडिओ, धर्मेंद्र आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दरम्यान, बॉलिवूडच्या या कलाकाराने जुन्या गाण्यावरील त्यांचे प्रेम व्यक्त केले असून, धर्मेंद्र यांचा एक मजेशीर व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर करण्यात आला आहे. तर लोक व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

धर्मेंद्र यांनी काही तासांपूर्वी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते रात्रीचे जेवण करताना जुनी गाणी गुणगुणताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी लिहिले आहे की, "एक मजेदार व्हिडिओ... मित्रांनो मी खातोय आणि गाणं गुणगुणतोय, जसे खाल्ल्याशिवाय जगता येत नाही... जुनी गाणी ऐकल्याशिवाय तहान भागत नाही..." हा व्हिडिओ पाहून चाहते धर्मेंद्र यांचे कौतुक करत आहेत.

धर्मेंद्र आता ८७ वर्षाचे आहेत. धर्मेंद्र यांनी अनेक हिट चित्रपट बॉलवूडला दिले आहेत. त्याचबरोबर अनेक पुरस्कारही त्यांच्या नावावर आहेत. त्याचबरोबर त्याच्या शोले या चित्रपटाला चाहत्यांचे अजूनही प्रेम मिळत आहे.

आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, धर्मेंद्र 'रॉकी आणि राणी की प्रेमकथा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT