Shilpa Shetty Instagram @theshilpashetty
मनोरंजन बातम्या

VIDEO : पाय फॅक्चर तरीही शिल्पा शेट्टीचा फाल्गुनीच्या 'वासलडी' गाण्यावर गरबा, पाहा

शिल्पाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूडची 'फिट अॅन्ड फाईन' अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर (Social Media) तिचा मोठा चाहतावर्ग आहे. शिल्पाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा गरबाच्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.

शिल्पा शिट्टीने सोशल मीडियावर गरबा क्वीन फाल्गुनी पाठकच्या 'वासलडी' गाण्यावर डान्स केलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे पायाला दुखापत झाली असून शिल्पा नवरात्रोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटत आहे.

शिल्पा शेट्टी फाल्गुनी पाठकच्या वासलडी गाण्यावर थिरकली आहे. पांढऱ्या रंगाचा प्लाझो आणि निळा कफ्तान कुर्तामध्ये शिल्पा अप्रतिम दिसत आहे. फाल्गुनीचं आवडीचं वासलडी गरबा गाणं सुरू होताच शिल्पा वॉकरला बाजूला करत एका पायावर नाचते आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ चाहत्यांना आश्चर्चचकित करत आहे.

शिल्पा शेट्टीला अलीकडेच रोहित शेट्टीच्या वेबसीरीजच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. तिला दुखापत झाली असूनही शिल्पाने व्हीलचेअरवर बसून एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शिल्पा शेट्टी लवकरच 'इंडियन पोलिस फोर्स' या पोलिसांवर आधारित वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. वेब सीरीजमध्ये शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय देखील असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवारांच्या नेत्याकडून शरद पवार गटातील नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Sanjay Raut: मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखाडायचे आहे उखाडा - संजय राऊत |VIDEO

Maharashtra Live News Update : बीडमधील लिफ्ट अपघातावर मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्याच्या प्रतिक्रिया

Raksha Bandhan Special : बहिणींनो भावांसाठी प्लान करा सरप्राइज ट्रिप, कर्जतजवळ आहे भन्नाट पिकनिक स्पॉट

Beed News: पुन्हा मैदानात या बजरंग सोनवणेंच्या मैत्रीदिनानिमित्त धनंजय मुंडेंना शुभेच्छा|VIDEO

SCROLL FOR NEXT