Laxmikant Berde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laxmikant Berde: लव्ह, लग्न, लोच्या; लक्ष्मीकांत बेर्डेंचं खरं आयुष्य कसे होते? वाचा सविस्तर...

लक्ष्मीकांत बेर्डेच्या आयुष्यात दोन लग्न झाले आहेत. पहिली लग्नगाठ रुहीसोबत तर दुसरी प्रिया बेर्डेसोबत बांधली होती.

Chetan Bodke

Laxmikant Berde: मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची आजही चुनुक कायम आहे. कमी कालावधीतच त्याने जगाचा निरोप घेतलेल्या या विनोदवीराचे चित्रपट आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. लक्ष्मीकांत यांनी मराठी साहित्य संघातून व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 'टूर टूर' या नाटकात लक्ष्याने आपली प्रमुख भूमिका साकारली.

'बिघडले स्वर्गाचे दार','शांतेचं कार्ट चालू आहे' या नाटकातील भूमिकेसाठी लक्ष्मीकांत यांना दाद मिळाली. १९८५ मध्ये लक्ष्मीकांत बेर्डेने 'लेक चालली सासरला' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत नायक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर 'दे दणादण', 'धूमधडाका', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'झपाटलेला' असे अनेक विनोदी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत.

दरम्यान, 'मैंने प्यार किया', 'साजन', 'बेटा', 'हम आप के है कौन' या सुपरहिट हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतील मुख्य अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या त्रिकुटांचे आजही कौतुक मराठी प्रेक्षकवर्ग कायम करतात. त्यातील एक कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डेचे चित्रपट जितके चर्चेत असतात तितकेच त्याचे खासगी आयुष्यही तितकेच चर्चेत होते.

लक्ष्मीकांत बेर्डेच्या आयुष्यात दोन लग्न झाले आहेत. पहिली लग्नगाठ रुहीसोबत तर दुसरी प्रिया बेर्डेसोबत बांधली होती. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले असून त्यांचे खासगी आयुष्य बरेच चर्चेत राहिले आहेत. अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांची दोन मुलं असून नुकतेच त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. मनोरंजनाने प्रेक्षकांना पोट धरुन हसवणाऱ्या 'लक्ष्या'च्या आयुष्यावर लवकरच जीवनपट चाहत्यांच्या समोर येणार आहे.

लक्ष्मीकांतचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्ष या दोघांचा संसार टिकला होता. लक्ष्मीकांत आणि रुही यांनी 'कमाल माझ्या बायकोची' या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. त्या चित्रपटात अल्का कुबल आणि लक्ष्मीकांत बेर्डे पती- पत्नीची भूमिका साकारली होती. तर रुही चित्रपटात दुसऱ्या भूमिकेत होत्या. या चित्रपटानंतर रुही आणि लक्ष्मीकांत यांचे लग्न झाले होते. परंतू कालांतराने यांच्या लग्नानंतर लक्ष्मीकांत आणि प्रिया हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सोबतच ते लिव्हइन रिलेशनशिपमध्ये ही राहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT