Urfi Javed New Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फीच्या फॅशनला वैतागून पोलिस अधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार…

अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे ती नेटकऱ्यांकडून ट्रोल होते.

Chetan Bodke

Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे ती नेटकऱ्यांकडून ट्रोल होते. तिच्या कपड्यांची चर्चा ही सोशल मीडियावर होणे काही नवीन नाही. उर्फी आपल्या दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर नेहमीच नेटकऱ्यांना भूरळ घालण्याचा प्रयत्न करते.

उर्फीला गेल्या काही दिवसांपुर्वी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकने बरेच ट्रोल केले होते. यांच्यामध्ये बरेच दिवस ट्रोलिंगचे युद्ध सुरु होते. नुकतेच सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावर बेकायदेशीर आणि अश्लील कृत्ये केल्याबद्दल सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद विरुद्ध एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी लेखी तक्रार दाखल केली आहे.

वकील अली काशिफ खान देशमुख यांनी शुक्रवारी अंधेरी पोलिस ठाण्यात लेखी अर्ज सादर केला असल्याचेही सांगण्यात आले होते. तिच्यावर बऱ्याचदा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी तिच्या वागण्यात कोणताच बदल झालेला दिसत नाही. ती नेहमी प्रमाणेच आपल्या खास अंदाजातील स्टाईल करत आहे.

उर्फी या आधी बिग बॉस ओटीटीवर सहभागी झाली होती. तेव्हापासून ती नेहमीच सोशल मीडियावर प्रकाश झोतात कायम आहे. सोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी उर्फी एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यात ती डान्स करताना चांगलीच धडपडली होती. त्यामुळे ही ती बरीच ट्रोल झाली होती. उर्फीने आतापर्यंत काचेच्या तुकडे, झाडांची पाने, फुल तर कधी सीडीच्या तुकड्यांनी आपली फॅशन करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart health: रात्री उपाशी पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

धक्कादायक! पायाने तुडवलेला मैदा थेट ताटात? 'त्या' व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ; FDA प्रशासनावर संताप

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

गोळ्या- औषधांचा खर्च वाचेल! रोज फक्त १ लवंग खाल्ल्याने शरीरात होतील ५ आश्चर्यकारक बदल

मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षेत दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; परीक्षा परिषदेने परीक्षार्थींना काय सूचना दिल्या?

SCROLL FOR NEXT