Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खानला माफ करा, राखी सावंतनं बिश्नोई समाजाची मागीतली माफी, Video व्हायरल!

Rakhi Sawaant Video Viral: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या जबरदस्त चर्चेत आहे. अभिनेता हा त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वैयक्तिक घडामोडीमुळे चर्चेत आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या जबरदस्त चर्चेत आहे. अभिनेता हा त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वैयक्तिक घडामोडींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीची हत्या झाली. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या जिवाला देखील धोका असल्याची माहिती आहे. अशातच आता बॉलिवूडची कॉमेडीक्वीन राखी सांवतचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राखीने तिच्या व्हिडीओमध्ये, "नमस्कार मी राखी सांवत, सलमान खानच्यावतीने मी बिश्नोई समाजाची माफी मागते. प्लिज तुम्ही त्याला माफ करा. सलमान खान माझा भाऊ आहे. त्याच्या वतीने मी माफी मागते. प्लीज माझ्या भावावर वाईट नजर ठेवू नये. प्लीज त्याला माफ करा. तो गरीबांचा अन्नदाता आहे. त्याला माफ करा." असं राखीने सांगितलं आहे. राखीने मीडियासमोर उठा-बश्या काढत बिश्नोई गँगची माफी मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या झाल्यानंतर सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अभिनेता सलमान खानसोबत जो कोणी असेल त्याने सावध राहा असा तो संदेश होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सलमानने काळवीट या प्राण्याची शिकार केल्याचं सागितलं जात आहे. तेव्हापासून सलमान खान हा अडचणीत आहे. काळवीट बिश्नोई समाजासाठी पवित्र मानला जातो. या घटनेनंतर बिष्णोई समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. बिष्णोई समाजाने सलमानविरोधात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तेव्हापासून बिष्णोई समाजाकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

SCROLL FOR NEXT