“पण कसं सांगू हे त्याचं बाळ नाही तर..." प्रेग्नंसी व्हिडीओमुळे भारती चर्चेत (Video) Saam Tv
मनोरंजन बातम्या

“पण कसं सांगू हे त्याचं बाळ नाही तर..." प्रेग्नंसी व्हिडीओमुळे भारती चर्चेत (Video)

व्हिडीओ शेअर करत भारतीने चाहत्यांना दिली गूडन्यूज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - कॉमेडियन म्हणून भारती सिंह अतिशय लोकप्रिय आहे. भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर आता भारतीच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत भारतीने चाहत्यांना ही गूडन्यूज दिली आहे.

सोशल मीडियावर भारतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटीव्ह येत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप आनंदी असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती “पण मी कसं सांगू की हे त्याचं बाळ नाही?” असे बोलते आणि त्यानंतर हसत, “आमच्या दोघांचे बाळ आहे” असे म्हणते. हर्ष आनंदाने भारतीला मिठी मारतो आणि म्हणतो, ‘बरं झालं भारतीने रेकॉर्ड केलं.

आम्ही आई होणार आहोत. सॉरी, भारती आई होणार आहे आणि मी बाबा.’ भारती हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘आम्हाला मिळालेले सर्वात मोठे सरप्राइज’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत मनसेची एंट्री? मोठ्या घडामोडीची शक्यता, बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

Maharashtra Live News Update : सुनावणीसाठी आलेला आरोपी पोलिसांच्या हातीत तुरी देऊन पसार, भिवंडीतील घटना

Kanbai Utsav : धुळ्यात कानबाई विसर्जन उत्सवात घडले दुर्दैवी; विसर्जनावेळी एकाचा बुडून मृत्यू

Ind vs Eng : DSP सिराजचा पंच! अटीतटीच्या सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत

तहसील कार्यालयात दारू पार्टी; हातात दारूचा ग्लास अन् गाण्यावर ठुमके, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT