Laughter Chefs Season 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laughter Chefs Season 2: लाफ्टर शेफ्स सीझन 2 चा ग्रँड फिनाले होणार या दिवशी रिलीज; स्पेशल गेस्ट म्हणून येणार 'हे' कपल

Laughter Chefs Season 2: कॉमेडी आणि कुकिंगचा अनोखा संगम असलेला ‘लाफ्टर शेफ्स - अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या शोचा दुसरा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

Shruti Vilas Kadam

Laughter Chefs Season 2: कॉमेडी आणि कुकिंगचा अनोखा संगम असलेला ‘लाफ्टर शेफ्स - अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या शोचा दुसरा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकप्रिय कॉमेडियन आणि सूत्रसंचालिका भारती सिंगने होस्ट केलेला हा शो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे

‘लाफ्टर शेफ्स’मध्ये विविध टीव्ही आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या कलाकारांनी सहभागी होऊन जेवण बनवत सोबत विनोदी संवाद आणि मिश्किल खेळीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवले. या शोमध्ये कृष्णा अभिषेक-कश्मीरा शाह, अंकिता लोखंडे-विक्की जैन, राहुल वैद्य-रुबीना दिलैक, सुदेश लहरी-निया शर्मा आणि अनेक प्रसिद्ध जोड्यांनी सहभाग घेतला.

या शोचे प्रेक्षकांमध्ये वाढते प्रेम पाहता, त्याचा फिनाले एपिसोड लवकरच प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे, हा फिनाले एपिसोड जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात Colors TV वर आणि JioCinema या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. एका वृत्तानुसार, हिना खान आणि तिचा पती रॉकी जयस्वाल अंतिम फेरीत पाहुणे म्हणून येऊ शकतात.

या सीझनमध्ये केवळ विनोद नव्हे, तर स्पर्धकांमध्ये पाककलेतील जुगलबंदीही पाहायला मिळाली. दर एपिसोडमध्ये काही वेगवेगळ्या पाककृती आणि मजेशीर टास्क्सद्वारे स्पर्धकांनी आपली कला सादर केली. त्याला परीक्षक आणि प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. फिनालेमध्ये विशेष पाहुण्यांची हजेरी लागणार असून, काही मजेशीर चकमकी आणि टास्क्सची योजना केली गेली आहे. त्यामुळे ‘लाफ्टर शेफ्स’चा शेवटचा भाग अत्यंत धमाल आणि मनोरंजनाने भरलेला असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT