Ekdam Kadak Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ekdam Kadak Trailer: "प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं" म्हणत 'एकदम कडक'चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची तरुणाईला प्रेमाची भूरळ घालणार

'एकदम कडक' म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींना तरुण कलाकारांचा घोळका तोडीस तोड देतोय हे ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसतंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ekdam Kadak Trailer Out: 'एकदम कडक' चित्रपटाच्या टिझरने प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आणि आता चित्रपटाच्या ट्रेलरने. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. "प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं" पासून 'प्रेम बीम काय नाय बरं का' या डायलॉग पर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांनी घातलेला धुडगूस पाहणं रंजक ठरणार आहे.

एकदम कडक म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींना तरुण कलाकारांचा घोळका तोडीस तोड देतोय हे ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसतंय. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत एकदम कडक चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत. येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.

'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले आहे. तर गीतकार म्हणून मंगेश कांगणे आणि गणेश शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे.

तर चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी सुरबद्ध केली आहेत. येत्या २ डिसेंबरला 'एकदम कडक' चित्रपटातील कलाकार एकदम कडक म्हणत मोठा पडदा कसा गाजवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT