Ground Zero Movie google
मनोरंजन बातम्या

Ground Zero Movie: जुळून येती रेशीम गाठीमधला कलाकार चमकणार बॉलिवूडमध्ये, सिरियल किसरच्या चित्रपटात आर्मी ऑफिसरची भूमिका

Lalit Prabhakar In Ground Zero Movie: ‘ग्राउंड झिरो’ या बॉलिवूड चित्रपटात ललित प्रभाकर पदार्पण करत आहे. इमरान हाश्मी सोबतच्या भूमिकेमुळे चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यावर आधारित असून २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Saam Tv

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मराठी अभिनेते अभिनेत्री पदार्पण करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेता ललित प्रभाकर बॉलिवूड चित्रापटाच्या ट्रेलरमध्ये दिसला. बॉलिवूडमधील एक काळ काजवणारा अभिनेता 'इमरान हाश्मी' (Emraan Hashmi)याच्यासोबत ललित प्रभाकर आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'ग्राउंड झिरो' असे आहे.

सध्या प्रेक्षकांमध्ये स्टारर 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. त्यामध्ये सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्या भुमिका पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. चाहत्यांना ही बातमी अभिनेता ललित प्रभाकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करुन दिली.

पोस्टमुळे प्रेक्षकांचे लक्ष आपसूक ललितच्या पोस्टकडे वळले. पोस्टमध्ये ललित म्हणाला, ''हा माझा पहिला हिंदी चित्रपट आहे. मी बॉलिवूडमध्ये काम करताना खूप खूश आहे. याची संधी @EXCELMOVIES मुळे मला मिळाली आहे. त्यांचे खूप खूप आभार. त्यासोबत @DCATALENT यांचे सुद्धा मनापासून आभार मी मानत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक @TEJASDEOSKAR यांच्यासोबत काम करून मला खूप शिकता आले.''

चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, 'ग्राउंड झिरो' या चित्रपटातील कथा सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये मुख्य भुमिकेत अभिनेता इमरान हाश्मी आहे. त्याने लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकरे बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर ललित प्रभाकर याने सहकाऱ्याची भुमिका साकारली आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT