Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss च्या घरात पार पडणार शेवटचं एलिमिनेशन, व्होटिंग लाइन्स केव्हा बंद होणार? जाणून घ्या

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) च्या घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस हा गेम रंजक होत जात आहे. हा बिग बॉस मराठीचा अंतिम आठवडा आहे. गेल्या आठवड्यात पॅडी दादा घराबाहेर गेले आहेत. पॅडी दादाच्या जाण्यामुळे सूरजला खूप दुःख झाले आहे. हे पर्व अवघ्या ७० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. बिग बॉसने दहा आठवड्यांत हा सीझन संपविला आहे.

'बिग बॉस मराठी'चं हे पर्व खूप गाजले आहे. घरातील सदस्यांवर लोकांनी भरपूर प्रेम केलं आहे. नुकताच घरात सूरज आणि निक्कीमध्ये फिनालेच्या तिकीटसाठी टास्क झाला. यामध्ये निक्कीने बाजी मारली आणि तिने 'तिकीट टू फिनाले' जिंकले. ती घरातील पहिली सदस्य ठरली जी फिनालेला पोहचली. अरबाजमुळे निक्कीला 'तिकीट टू फिनाले' मिळाले आहे. अरबाजने घरातून बाहेर जाताना म्युचुअल फंड्सचे कॉइन्स निक्कीला दिले होते.

'बिग बॉस मराठी' ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबर ला पार पडणार आहे. निक्की सोडून घरातील इतर सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या पर्वाचे शेवटचं एलिमिनेश (Elimination ) लवकरच पार पडणार आहे. यात धनंजय दादा, अंकिता, जान्हवी, अभिजीत, सूरज आणि वर्षा ताई हे सात सदस्य नॉमिनेटेड आहेत. २ ऑक्टोबर रात्री १०.३० पर्यंत व्होटिंग लाइन्स सुरू राहणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडत्या सदस्याला जिंकवण्यासाठी वेळेत व्होट करा. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : मंगळवार तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य

Marathi News Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

Women T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाने भारताच्या स्वप्नांवर पाणी; टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Toll-free entry in Mumbai : मुंबईकरांना टोलमाफीचं गिफ्ट; कोणत्या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना 'टोल फ्री'? VIDEO

Maharastra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; संजीवराजे,दीपक चव्हाणांच्या हाती तुतारी, आता फलटणमध्ये गणित काय? VIDEO

SCROLL FOR NEXT