Lai Avadtes Tu Mala  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lai Avadtes Tu Mala : मालिकेत नवा ट्विस्ट; सरकार अन् सानिकावर साहेबराव घेणार सूड, गृहप्रवेशाच्या दिवशी कोणते विघ्न येणार?

Lai Avadtes Tu Mala Update : 'लय आवडतेस तू मला' मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेत सरकार - सानिकाला आता नवीन वादळाला सामोरे जावे लागणार आहे.

Shreya Maskar

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सरकार - सानिका लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले तर गेले पण आता त्यांना साहेबरावांच्या द्वेषाला सामोरे जावे लागणार आहे. या द्वेषाच्या अग्नीत कोणकोण होरपळून निघेल ते हळूहळू कळेलच. सरकार - सानिका साहेबरावांपासून बचाव करण्यासाठी कळशी गावात जाण्याचा निर्णय घेतात. पण त्यांच्या या निर्णयामुळे आप्पांना गावकऱ्यांच्या रागाला सामोरे जावे लागते. आप्पा गावकऱ्यांना सांगतात की, सानिका आता कळशी गावची सून आहे.

सानिका - सरकार कळशी गावात येतात. पण सरकारच्या घरात त्यांना प्रवेश मिळेल का ? हा मोठा प्रश्न तिच्यासोमर उभा राहतो. सानिकाच्या गृहप्रवेशाच्या दिवशीच विघ्न दारापुढे उभे राहते. साहेबराव त्यांचा सूड घेण्यासाठी थेट कळशी गाव गाठतात आणि सानिकाचा जीव घेण्यासाठी गोळी झाडतात. आता पुढे काय होणार ? सरकार - सानिकाची प्रेमकथा सुरु होण्याआधीच संपणार का? हे आता येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

साहेबरावांना त्यांचा सूड इतका प्रिय झाला आहे की, त्याची पट्टी त्यांच्या डोळ्यावर बांधली गेली आहे आणि त्यामुळेच ते आपल्या स्वतः च्या पोरीचे श्राद्ध घालण्यात देखील मागे पुढे बघत नाही. पण खरंतर आता सरकार - सानिकाच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरु झाली आहे. दोन गावामधील वैर लक्षात घेता साहेबराव आता कळशी गावातील फॅक्टरी तर बंद नाही ना करणार या संभ्रमात आप्पासाहेब आहेत.

साहेबराव याच वैरामुळे सरकार - सानिकाचा जीव घेण्यासाठी देखील मागे पुढे बघणार नसून त्यांनी जाहिरात देखील दिली होती. जो कोणी या दोघांना पकडेल त्यांना बक्षीस देण्यात येईल कारण सरकार - सानिकाला साहेबरावांना त्यांच्या हाताने मारायचे आहे. आता मालिकेत पुढे काय होईल साहेबरावांचा द्वेष जिंकेल कि सानिका - सरकारचे प्रेम ? आणि याच प्रेमाने ते साहेबरावांचे मत परिवर्तन करू शकतील का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala) ही लोकप्रिय मालिका कलर्स मराठीवर रात्री ९.३० वाजता लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT