'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत रम्या बोक्याचा बंदोबस्त करताना दिसणार आहे.
काव्या आणि रम्यामध्ये पुन्हा राडा होणार आहे.
काव्या-पार्थ आणि नंदिनी-जीवाचे नातं पुन्हा खुलताना दिसत आहे.
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत जीवा आणि काव्याचे अफेअर सर्वांना समजते. त्यानंतर चौघाचे आयुष्य बदलते. नंदिनी जीवाकडे आणि पार्थ काव्याकडे घटस्फोट मागतो. मात्र जीवा आणि काव्या आपापले प्रेम मिळवण्याचा निश्चय करतात. जीवा नंदिनीच्या घरी राहायला जातो. तर काव्या पार्थच्या घरी येते. आता या चौघांचे नाते कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जीवा- काव्या आपल्या जोडीदारांचे म्हणजे नंदिनी-पार्थचे विश्वास आणि मनं जिंकण्यासाठी 'लग्नासाठी कायपण' हे मिशन सुरू करतात. जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थच्या नात्यात प्रेम पुन्हा फुलताना दिसत आहे. मात्र काव्या-पार्थच्या लव्ह स्टोरीमध्ये रम्या नावाचे वादळ अजूनही आहे. रम्या प्रत्येक वेळी पार्थच्या जवळ जाण्याचा आणि काव्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. अशात आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
'लग्नानंतर होईलच प्रेम' च्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, काव्या आपल्या खोट्या बोक्यासोबत खेळत असते. काव्या पार्थला प्रेमाने बोका म्हणते. म्हणून ती घरात खोटा बोका (soft toy) घेऊन येते. त्याच्या डोळ्याला चष्मा लावते. त्याच्याशी बोलते. मात्र रम्या आणि वसूला हे अजिबात आवडत नाही. ते काव्याला कायम त्रास देताना दिसतात.
बोक्या सोबत खेळताना वसू आणि रम्या काव्याला पाहतात. तेव्हा वसू बोलते की, "या बोक्याचा बंदोबस्त करायला पाहिजे..." मग रम्याच्या हातात कात्री पाहायला मिळते. त्यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की, रम्या बोक्याला कापते. तेवढ्यात काव्या घरात बोक्याला शोधताना दिसते. मानिनी आणि पार्थ सर्वच धावून येतात. तेवढ्यात काव्यावर बोक्याचा कापूस पडतो. ती वर पाहते तर वसू आणि रम्या उभ्या असतात, ते पाहून काव्या जोरात 'रम्या' असे ओरडते.
व्हिडीओच्या प्रोमोला "काव्या ओळखणार रम्याची चाल..." असे कॅप्शन देण्यात आले आहे. सोमवारी मालिकेत पुन्हा काव्या रम्याला भिडताना दिसणार आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका 7.00 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. आता रम्या खरंच बोक्याला फाडणार? काव्या रम्याला कसा धडा शिकवणार? हे सर्वच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.