Lagnanantar Hoilach Prem  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lagnanantar Hoilach Prem : "आमच्या चौघांच्या आयुष्याचा शेवट केला तुम्ही..."; नंदिनी आत्याबाईंना थेट विचारणार जाब, पाहा VIDEO

Lagnanantar Hoilach Prem Update : 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत आता मोठा खुलासा होणार आहे. नंदिनी आत्याबाईंना जाब विचारताना दिसणार आहे. नंदिनी सगळ्यांसमोर आत्याबाईंचं कारस्थान आणणार आहे.

Shreya Maskar

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे.

नंदिनी आत्याबाईंचे खोटे सर्वांसमोर उघड करणार आहे.

नंदिनी आत्याबाईंना थेट जाब विचारताना दिसत आहे.

'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanantar Hoilach Prem) मालिका सध्या प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. मालिकेतील दोन्ही जोड्या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. आता मात्र मालिकेत मोठे सत्य समोर येणार आहे. याचा खास प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केला आहे. नंदिनी लग्नाच्या वेळी तिला किडनॅप करण्याचा प्लान वसु आत्यांचा असल्याचे सत्य सर्वांसमोर घेऊन येणार आहे.

प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, देशमुख मंडळी देवासमोर हात जोडून उभे असतात. नंदिनी देवाची आरती करत असते. तेव्हा ती आरती देण्यासाठी वसुंधरा आत्याजवळ जाते आणि नंदिनी वसु आत्याला विचारते की, शत्रू घरातलाच असेल तर काय करायचे आत्या? त्यावर वसु आत्या म्हणते की, तु मला का विचारतेस? त्यावर नंदिनी म्हणते की, "कारण आमच्या चौघांच्या आयुष्याचा शेवट केला तुम्ही...दीपकशी हातमिळवणी करून मला किडनॅप करण्याऱ्या वसु आत्या होत्या..." हे ऐकताच घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो. मालिकेत आता वसु आत्याच्या खोटेपणाचा पर्दाफाश होणार आहे.

नंदिनीला वसु आत्याच खोट पिहुकडून समजते. पिहूने लग्नाच्या वेळी वसुंधरा आणि रम्याला बोलताना ऐकले होते की, नंदिनीली किडनॅप करण्यासाठी वसुंधराने दीपकला साथ दिली होती. आता मालिकेत पुढे काय होणार? वसु आत्या आपली चूक मान्य करणार का? नंदिनी-जिवा, काव्या-पार्थ यांचे नाते कोणते वळण घेणार हे सर्वच पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका संध्याकाळी 7:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळते.

'लग्नानंतर होईलच प्रेम'च्या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. मालिकेत आता नंदिनी-जिवा, काव्या-पार्थ यांच्यात मैत्रीचे नाते फुलताना दिसत आहे. त्यांच्या नात्यात चढउतार येत आहेत. मात्र चौघेही एकमेकांना कायम साथ देताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा; भारतावरच केला मोठा आरोप

GST Reform: आता GST मध्ये फक्त 2 स्लॅब, नवीन दर 22 सप्टेंबरपासून होणार लागू

Apple Cider Vinegar: त्वचेवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने कोणते परिणाम होतात?

IAS Transfers List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच; कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT