'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये आता जोड्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
काव्या-पार्थ आणि नंदिनी-जीवाचे नातं पुन्हा खुलताना दिसत आहे.
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळते.
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत जीवा आणि काव्याचे अफेअर सर्वांना समजते. त्यानंतर चौघही वेगळे होतात. नंदिनी जीवाकडे आणि पार्थ काव्याकडे घटस्फोट मागतो. मात्र जीवा आणि काव्या आपापले प्रेम मिळवण्याचा निश्चय करतात. जीवा नंदिनीच्या घरी राहायला जातो. तर काव्या पार्थच्या घरी येते. आता कुठे तरी पु्न्हा काव्या आणि पार्थचे जुळताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नंदिनीच्या वडीलांनी जीवाला घराबाहेर काढले आहे. त्यामुळे जीवा खूपच अस्वस्थ होतो.
दारूच्या नशेत नंदिनीने जीवावरच्या प्रेमाची कबुली दिली. मात्र नंदिनीला असे वाटते की, जीवानेच दारू तिला प्यायला दिली. जीवा एकटाच घरी येतो. ज्यामुळे घरातील लोकांना देखील खूप मोठा धक्का बसतो. व्हिडीओमध्ये काव्या एका मैत्रिणीप्रमाणे जीवाची समजूत काढताना दिसत आहे. आता काव्या-पार्थ आणि नंदिनी-जीवा कधी एकत्र येणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'लग्नानंतर होईलच प्रेम'चा नवीन प्रोमो आला आहे. ज्यात जीवा आणि काव्या एकमेकांशी बोलताना दिसत आहे. काव्या जीवाला समजवत आहे. गेले काही दिवस जीवा नंदिनीचे आणि काव्या पार्थचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. चौघे लवकरच एकत्र येणार असल्याचे दिसत आहे. काव्या जीवाला बोलते की, "लवकरच गैरसमजाची धूळ पुसली जाईल आणि नंदिनी ताईला तुझं आणि पार्थला माझं लग्नानंतरचं प्रेम दिसेल..."
काव्या आणि जीवाचे बोलणे लांब उभा राहीलेला पार्थ ऐकतो आणि लगेच नंदिनीला भेटायला जातो. पार्थ नंदिनीला म्हणतो की, "आज मी काव्या जीवाला एखाद्या छान मित्रासारखे बोलताना पाहिले. भूतकाळ विसरून आपल्यासाठी ते पुढे आले आहेत. आता आपणही एक पाऊल पुढे टाकायसा हवं" या व्हिडीओवर प्रेक्षकांकडून भरपूर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका 7.00 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.