Dnyanada Ramtirthkar saam tv
मनोरंजन बातम्या

Dnyanada Ramtirthkar : लगीन घटिका समीप आली! ज्ञानदाचा होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिला PHOTO; थाटात पार पडला साखरपुडा

Dnyanada Ramtirthkar Engagement : लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे कला क्षेत्राशी खास नातं आहे. सुंदर फोटो पाहा.

Shreya Maskar

'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने साखपुडा केला आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरने तिच्या बॉयफ्रेंडसोबत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये ज्ञानदा काव्याची भूमिका साकारते.

'लग्नानंतर होईलच प्रेम' मराठी मालिका प्रेक्षकांचे सध्या भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत आता काव्या-पार्थ, जीवा- नंदिनीचे नातं तुटलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता जीवा आणि काव्या मिळून आपापले प्रेम मिळवणार आहेत. त्यामुळे मालिका खूपच रंजक वळणावर आहे. मालिकेत जरी काव्याचे लग्न तुटले असले. तरी खऱ्या आयुष्यात मात्र काव्याला आपले प्रेम भेटले आहे.

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काव्याचे पात्र अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साकारले आहे. नुकताच ज्ञानदानं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. साखरपुड्याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्ञानदाने तिच्या मेहंदी सोहळ्याचा सुंदर व्हिडीओ टाकला होता. त्यात कॅप्शनमध्ये 'HD' लिहिलेले होते. त्यामुळे अभिनेत्रीच्या नवऱ्याचे नाव 'H' वरून असणार हे स्पष्ट झाले होते. मात्र ज्ञानदाने नवऱ्याचा चेहरा आणि नाव गुलदस्त्यात ठेवले होते. आता मात्र याचा उलगडा झाला आहे.

ज्ञानदाने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिल्यांदा फोटो शेअर केले आहेत. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव हर्षद आत्माराम आहे. तो एक प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. त्याने मालिका, चित्रपट यांच्यासाठी सिनेमॅटोग्राफी केली आहे. ज्ञानदा आणि हर्षद अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. ज्ञानदाच्या फोटोंवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

साखरपुड्यासाठी ज्ञानदा आणि हर्षदने पांरपरिक लूक केला होता. ज्ञानदाने गोल्डन रंगाची डिझायनर ब्लाऊज असलेली साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, मिनिमल मेकअप, क्यूट हेअर स्टाइल करून सुंदर लूक पूर्ण केला. तर हर्षदने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट परिधान केले होते. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways: TTE आणि TC यांच्यातील फरक तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: सलग पाच दिवसांच्या अतिवृष्टीचा नालासोपाऱ्यात तिसरा बळी; पाण्यात पोहताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

पावसात भिजल्यानंतर प्या गरमा गरम ब्रोकोली सूप, हुडहुडी होईल दूर

ITR Filing 2026-27: ITR भरताना कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे दाखवावे लागतील का? नवीन नियम सोप्या भाषेत समजून घ्या

SCROLL FOR NEXT