Kushal Badrike On Struggle Sala  Instagram @badrikekushal
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike Share Post: स्वतःचा प्रवासखर्च, जेवण सुद्धा घरचं... कुशलची अशी अवस्था का झाली? हे आहे कारण

Kushal Badrike: कुशल बद्रिकेने त्याच्या सोशल मीडियावर एक विलक्षण गोंधळला फोटो पोस्ट केला आहे.

Pooja Dange

Kushal Badrike On Struggle Sala: अभिनेता आणि विनोदी नट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने टीव्ही, चित्रपट, ओटीटी अशा वेगवगेळ्या माध्यमातून आपल्याला भेटता असतो. कुशल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कुशल त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्यातील खास गोष्टी शेअर करत असतो. कुशलने स्ट्रगल साला विषयी एक महत्त्वाची बातमी शेअर केली आहे.

कुशल बद्रिकेने त्याच्या सोशल मीडियावर एक विलक्षण गोंधळला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कुशलच्या हातात ट्रॉली बाफ, दोन सूट, शूज, पँट, डोपण पिशव्या असं सगळं आहे. या फोटोमध्ये कुशल खूपच अस्थाव्यस्थ दिसत आहे.

कुशलने ही फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, 'स्वतःचे बूट, स्वतःचे कपडे, स्वतःची बॅग, स्वतःचा मेकअप, स्वतःचा प्रवासखर्च, जेवण सुद्धा घरचं... याचा अर्थ आज 'स्ट्रगलर सालाचं' “शुट्टू” आहे.'

कुशलची पोस्ट वाचल्यावाल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो इतकं सगळं सामान घेऊन 'स्ट्रगलर साला' शूटिंगला जात आहे. गेली अनेक वर्ष कुशल या वेबसीरीजमध्ये काम करत आहे. ही वेबसीरीजमध्ये स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांच्या व्यथा मांडल्या आहेत. (Latest Entertainment News)

कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर त्याचा या वेबसीरीजमधला कोस्टर संतोष जुवेकरने देखील कमेंट केली आहे. संतोष जुवेकर म्हणाला, 'साल्या विजू देतो आपल्याला जेवायला..... निदान.' श्रेया बुगडे, प्रार्थना बेहरे, राधाने देखील कमेंट केली आहे. नेटकरी सुद्धा स्ट्रगलर सालाचे कमेंट करत कौतुक करत आहेत.

कुशल 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या भेटीला येत असतो. तसेच तो रावरंभा या चित्रपटामध्ये दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT