Upcoming Web Series : कौटुंबिक प्रेमाची थरारक कथा; 'आरंभ' नवी वेबसीरीज प्रदर्शित

Aarambha New Web Series : नवीन वेबसीरीज 'आरंभ: अ रिव्हटिंग टेल ऑफ फॅमिली, लव्ह, लॉस अँड ट्रॅडिशन, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
Aarambha New Web Series
Aarambha New Web SeriesSaam TV
Published On

New OTT App WATCHO : भारतातील वेगाने वाढणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या 'वॉचो'ची लवकरच प्रदर्शित होणारी नवीन वेबसीरीज 'आरंभ: अ रिव्हटिंग टेल ऑफ फॅमिली, लव्ह, लॉस अँड ट्रॅडिशन, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

कौटुंबिक नातेसंबंध दृढ होणे, परंपरा टिकवून ठेवणे आणि फसव्या व्यवस्थेविरुद्धचा धोकादायक संघर्ष या वेबसीरीजमधून उलगडण्यात आला आहे. शौर्य सिंह दिग्दर्शित 'आरंभ' वेब सीरिजची निर्मिती सिल्व्हर रेन पिक्चर्स आणि एमएजी एंटरटेन्मेंट यांनी केली आहे.

Aarambha New Web Series
Jailer Movie Box Office Collection: रजनीकांत गाजतोय, नाचतोय अख्ख्या जगात; पहिल्याच दिवशी केली तगडी कमाई

'आरंभ'ची कथा

मुलाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पत्नी स्मितासोबत अमेरिकेत राहणाऱ्या श्रीकांत शर्माची थरारक कहाणी 'आरंभ' या वेबसीरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. दरम्यान, श्रीकांतचे वडील उदय शंकर शर्मा रांचीजवळील लाल नगर या उपनगरात आपल्या धाकट्या मुलाच्या कुटुंबासह जीवन जगत आहेत.

मात्र, उदय शंकर शर्मा यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाल्याने नशिबाला वेगळे वळण लागते.

आपल्या लाडक्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी श्रीकांत भारतात परततो. भारतात पोहोचल्यावर श्रीकांतला एक धक्कादायक सत्य समजते - त्याच्या वडिलांचा मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी रुग्णालयात दान करण्यात आला आहे, तर त्याच्या कुटुंबाला संमती घेताना फसवण्यात आले आहे, परंतु सत्य त्याहून अधिक त्रासदायक असते. (Latest Entertainment News)

Aarambha New Web Series
Sridevi Birth Anniversary: इंग्लिश विग्लिश, सदमा नाही तर 'हा' आहे श्रीदेवीचा सर्वाधिक रेटिंग असलेला सिनेमा; पाहा टॉप मूवी लिस्ट

एका वॉर्ड बॉयने अनैतिक मार्गचा अवलंब करून मृतदेह अवयव तस्करीसाठी विकल्याचे त्याला समजले. श्रीकांतला न्याय मिळेल आणि वडिलांवर अंत्यसंस्कार होतील की वाईट लोकांच्या संपर्कात आल्याने त्रासाला आमंत्रण देणार? या वेबसीरीजमध्ये अमित गौर, करण ठाकूर, दीपाली शर्मा आणि मनीष खन्ना या कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत.

डिश टीव्ही आणि वॉचोचे कॉर्पोरेट हेड मार्केटिंग, सुखप्रीत सिंग म्हणाले, "आम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर 'आरंभ' सादर करताना खुप आनंदी आहोत. हे मार्मिक कथानक आपल्या कौटुंबिक नातेसंबंधांची संवेदनशीलता, संस्कृती आणि व्यवस्थेच्या उदासीनतेला स्पर्श करते, जे देशभरातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

या वेबसीरीजमध्ये देशात प्रचलित असलेल्या गुप्त गुन्ह्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अर्थपूर्ण मनोरंजन देण्यासाठी 'वॉचो' कटिबद्ध आहे आणि वैविध्यपूर्ण आणि आकर्षक कथानक प्रदान करण्याच्या आमच्या समर्पणाचा पुरावा म्हणजे 'आरंभ'.

'वॉचो'च्या 'आरंभ' या वेबसीरजद्वारे दमदार सिनेमॅटिक अॅडव्हेंचर प्रवासाला सुरुवात करा. ही विचार करायला लावणारी कथा मूल्यांची ताकद आणि प्रचलित समाजव्यवस्थेला आव्हान देण्याचे धाडस दाखवते, ज्याचा प्रेक्षकांवर खोलवर परिणाम होतो. कौशल्याने विणलेली ही कथा आव्हानांवर मात करून प्रेक्षकांवर ठसा उमटवणाऱ्या मानवी गुणांचा गौरव करते.

2019 मध्ये लाँच झालेल्या 'वॉचो एक्सक्लुझिव्ह'मध्ये गिलहरी, जॉइंट अकाउंट, मंगदंत, अवैद्य, स्फोटक, आरोप, वजाह, द मॉर्निंग शो, बौचर-ए-इश्क, गुप्ता निवास, जौनपूर अशा वेबसीरीजचा समावेश आहे. इतकंच नाही तर वॉचो कोरियन ड्रामा आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमही सादर करते.

'वॉचो'विषयी थोडक्यात

गेल्या वर्षी वॉचोने दरमहा 253 रुपयांच्या प्लॅनसह ओटीटी एग्रीगेशन बिझनेसमध्ये प्रवेश केला होता. 17 लोकप्रिय ओटीटी अॅप्ससह हे ऑल-इन-वन ओटीटी सब्सक्रिप्शनसाठी वेगाने गो-टू डेस्टिनेशन बनत आहे.

वॉचोमध्ये सबस्क्राईबरने तयार केलेल्या कटेंटसाठी 'स्वॅग' नावाचे एक अनोखे व्यासपीठ देखील आहे, जेथे लोक स्वत: चा कटेंट तयार करू शकतात आणि त्यांची क्षमता शोधू शकतात.

विविध डिव्हाइसेसवर (फायर टीव्ही स्टिक, डिश एसएमआरटी, अँड्रॉइड आणि आयओएस सेलफोन आणि डी 2 एच मॅजिक डिव्हाइससह) किंवा ऑनलाइन पाहा. www.WATCHO.comवर प्रवेश करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com