Kushal Badrike Post Instagram @badrikekushal
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike Share Post: मुलांना आपले सुपरहिरो आधी कळायला हवेत... कुशल बद्रिकेने पोस्ट करत इतिहास जाणून घेण्याचे केले आवाहन

Kushal Badrike On Superheros : सुपरहिरोची क्रेझ असलेल्या आजच्या पिढीला कुशल आपल्या ओरिजनल सुपरहिरोंची ओळख करून दिली आहे.

Pooja Dange

Kushal Badrike Spoke About His Movie Raavrambha: कुशल बद्रिके 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून आपल्या भेटीला येत असतो. विविध विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारा कुशल 'रावरंभा' या चित्रपटामध्ये 'कुराबतखान' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. रावरंभा हा एक ऐतिहासिक चित्रपट असून २६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'रावरंभा' हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे.

कुशल बद्रिकेने या चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. सुपरहिरोची क्रेझ असलेल्या आजच्या पिढीला कुशल आपल्या ओरिजनल सुपरहिरोंची ओळख करून दिली आहे. 'रावरंभा' या चित्रपटातून आपलयाला आपल्या सुपरहिरोंची ओळख होणार असल्याचे कुशलने सांगितले आहे. (Latest Entertainment News)

काय म्हणाला कुशल बद्रिके ?

कुशल बद्रिकेने चित्रपटाचे पोस्टर आणि चित्रपटातील त्याचा लूक शेअर करत लिहिले आहे की, "मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” आधी कळायला हवा.

मुलांना स्पार्टन-300 ची गोष्ट कळायला हवी, पण पावनखिंडीवर बाजीप्रभू देशपांडेंसह प्राणांची आहुती देणारे “300 मावळे” आधी कळायला हवेत. लढाई जिंकून देणारा महाबली हल्क मुलांना माहित हवा, पण शौर्य आणि इमान यांच दुसरं नाव असलेले सरसेनापती “हंबीरराव मोहिते” आधी कळायला हवेत.

आयर्न मॅन ची गोष्ट मुलांना आपण सांगायलाच हवी, पण लोखंडाच्या सळ्यांनी डोळ्यांच्या खाचा झाल्या तरीही एकही हुंदका न देणारे आपले “छत्रपती संभाजी राजे” आधी कळायला हवेत.
कॅप्टन अमेरिकेच्या नेतृत्वाला लाजवील असं आपल्या “छत्रपती शिवाजी महाराजांचं” नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर रक्तात भिनायला हवं. आपले सुपरहिरोज मुलांना आधी कळायला हवेत.

यावेळी आम्ही घेऊन आलोय आपल्या अशाच “7सुपरहिरो” ची कहाणी…. वेडात दौडलेल्या त्या “सात वीरांची” गोष्ट". सरसेनापती “प्रतापराव गुजर” आणि सोबतीच्या “सहा मावळ्यांची” गोष्ट
मुलांना ही गोष्ट बघायला नक्की घेऊन या. सिनेमा :- “रावरंभा” आपल्या जवळच्या चित्रपटगृहात."

कुशलच्या या पोस्टवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. तसेच त्याने लिहिलेल्या कॅप्शनचे कौतुक करत आहेत. आपला इतिहास चित्रपटातून दाखवला जात आहे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहचत आहे, हे देखील नेटकरी बोलून दाखवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT