Kamal Haasan at IIFA : कमल हसन देखील 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या विरोधात... यफाच्या मंचावरून केली टीका

Kamal Haasan Reaction : 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या वादावर कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Kamal Haasan at IIFA : कमल हसन देखील 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या विरोधात... यफाच्या मंचावरून केली टीका

Kamal Haasan Reaction On The Kerala Story: 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या वादावर कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कमल हसन म्हणाले आहेत की, मी प्रोपगंडा चित्रपटांच्या विरोधात आहे. अभिनेत्री अदा शर्मा स्टारर 'द केरला स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

अनेक विरोध होत्व असतानाही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून 'द केरला स्टोरी'बाबत चित्रपट कलाकारांना प्रश्न विचारले जात आहेत. या चित्रपटावर बंदी घालणे हा योग्य निर्णय असेल का, असा प्रश्न विचारले जात आहे.

Kamal Haasan at IIFA : कमल हसन देखील 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या विरोधात... यफाच्या मंचावरून केली टीका
Shreya Bugde Share Post: प्रेक्षकांचे आभार मानत श्रेया बुगडेने शेअर केली पोस्ट, म्हणाली माझं कौतुक करायला आल्या अन्...

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी चित्रपट आणि त्यातील वादांबाबत त्यांचे मत मांडले आहे. त्यांनी 'द केरला स्टोरी' हा प्रोपगंडा चित्रपट असल्याचे म्हटले आहे. जो देशात खोट्या द्वेष पसरवत आहे.

कमल हसन अबुधाबीमध्ये आयफामध्ये सहभागी झाले होते. तिथे त्याला 'द केरला स्टोरी'वर त्यांना त्यांचे मत मांडण्यास सांगितले. ज्यावर कमल हसन यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी प्रोपगंडा चित्रपटांच्या विरोधात आहे.

कमल हसनच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट खोट्या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत ज्यामुळे देश विभागाला जाईल. तुम्ही जेव्हा सत्य कथेवर आधारित असे लिहिता ते खरे देखील असले पाहिजे आणि चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेल्या घटना खऱ्या नाहीत.

ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते की, त्यांना या चित्रपटामागील कथा आवडलेली नाही. त्यांच्या मते या चित्रपटाचे निर्माते खोटे बोलले आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी 32,000 हिंदू मुलींचे धर्मांतर आणि दहशतवादासाठी ISIS मध्ये तस्करी केल्याचा दावा केला होता. त्यानंतर हा वाद सुरू झाला.

वादानंतर या चित्रपटाला पश्चिम बंगालमध्येही बंदीला सामोरे जावे लागले होते. पश्चिम बंगालमधील द केरला स्टोरीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने आठवड्याभरापूर्वी उठवली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com