Kundali Bhagya Fame Actor Manit Joura Gets Married Instagram
मनोरंजन बातम्या

Manit Joura Wedding: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याने ग्रीक गर्लफ्रेंडशी उरकलं गुपचूप लग्न, उदयपुरमध्ये रंगला शाही विवाहसोहळा

Manit Joura And Andria Panagiotopoulou Wedding: ‘कुंडली भाग्य’ फेम ऋषभचे पात्र साकारणऱ्या मनितने गुपचूप लग्न केलं आहे.

Chetan Bodke

Kundali Bhagya Fame Actor Manit Joura Gets Married: टेलिव्हिजन विश्वातून आनंदाची बातमी येत आहे. फेमस मालिका ‘कुंडली भाग्य’ही मालिका नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे. ही मालिका नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या या मालिकेतील सेलिब्रिटी चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ‘कुंडली भाग्य’ फेम ऋषभचे पात्र साकारणऱ्या मनितने गुपचूप लग्न केलं आहे. मनितने त्याची गर्लफ्रेंड अँड्रिया पनागिओटोपोलु सोबतच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्याने लग्नाविषयीची माहिती देत चाहत्यांना सुख:द धक्का दिला आहे.

अभिनेत्याने गर्लफ्रेंड अँड्रियासोबत गेल्या ९ जुलै रोजी गुपचूप लग्न केले. मनितच्या पत्नीबद्दल बोलायचे तर, ती पेशाने डान्स टीचर आहे. मनित आणि अँड्रिया अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आपले नाते पुढे नेण्याचा विचार करत लग्नाचा विचार केला. ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्याने नुकताच लग्नाविषयी खुलासा केला आहे.

मनितने प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘मला अँड्रियासोबत लग्न करायचं आहे हे आधीपासूनच ठरलं आहे. आमच्या लग्नाच्या दिवशी खूप पाऊस पडत होता. त्या दिवशी जरी, पाऊस पडला तरी आमचं लग्न निर्विघ्न पार पडलं. आमच्या लग्नामध्ये एक खूपच खास गोष्ट होती, ती म्हणजे, लग्नात मनितने त्याच्या पूर्वजांची 108 वर्ष जुनी तलवार घेतली होती. त्या तलवारीवर त्याच्या कुटुंबातील सर्व पुरूष सदस्यांची नावं होती.’

१० वर्षांपूर्वी मनित आणि अँड्रिया विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून भेटले होते. पूर्वी ते एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांनी ही आपल्या मनातील भावना २०१९ मध्ये एकमेकांसोबत शेअर केल्या होत्या.

त्याबद्दल बोलताना मनित म्हणाला, “आम्ही दोघेही खूप चांगले मित्र होतो. अँड्रिया मला आध खूप चांगली ओळखायची. मी अँड्रियाला मुंबई एअरपोर्टवर सर्वात पहिले प्रपोज केला होता, कारण आमच्या दोघांचीही पहिली भेट तिकडेच झाली होती.”

जानेवारी महिन्यात मनितने अँड्रियाला फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं. आता दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अँड्रिया आणि मनितच्या लग्नातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्याही व्हायरल होणाऱ्या फोटोंवर चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मनित जौराच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने ‘मुझसे कुछ कहती ये खामोशियां’ या टेलिव्हिजन मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

सोबतच त्याने ‘सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलेन्स’, ‘प्रेम बंधन’, ‘कुंडली भाग्य’ आणि ‘नागिन’ सारख्या मालिकेत देखील मनितने प्रमुख भूमिका साकारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT